---Advertisement---

धोनीच्या शिष्याला क्विंटन डी कॉकने ‘धोनी स्टाईल’मध्ये धाडले माघारी, पाहा व्हिडिओ

On: गुरूवार, जानेवारी 20, 2022 12:03 PM
Rishabh Pant
---Advertisement---

बुधवारी (१९ जानेवारी ) पार्लच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (south africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला वनडे सामना पार पडला. केएल राहुलच्या (Kl Rahul) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाकडून या सामन्यात चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा होती. परंतु, भारतीय संघाला या सामन्यात ३१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह दक्षिण आफ्रिका संघाने या मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका संघाकडून क्विंटन डीकॉकने (Quinton dekock) विजेच्या वेगाने रिषभ पंतला यष्टीचीत केले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दक्षिण आफ्रिका संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना रिषभ पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याने २२ चेंडूंमध्ये १६ धावांचे योगदान दिले. त्यानंतर तो ज्याप्रकारे बाद झाला ते पाहून कोणालाही विश्वास बसत नव्हता.

तर झाले असे की, रिषभ पंत फलंदाजी करत असताना दक्षिण आफ्रिका संघाकडून ३५ वे षटक टाकण्यासाठी अँडिले फेहलुक्वायो गोलंदाजीला आला होता. या षटकातील पहिलाच चेंडू त्याने लेग साईडच्या दिशेने टाकला, ज्यावर रिषभ पंतने लेग साईडच्या दिशेने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला.

परंतु, पंतचा हा प्रयत्न हुकला आणि चेंडू यष्टिरक्षक करत असलेल्या क्विंटन डी कॉकच्या हातात गेला. त्याने क्षणभरही वेळ न दवडता, वाऱ्याच्या वेगाने रिषभ पंतला यष्टीचीत केले आणि पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हा व्हिडिओ क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करताना २९६ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये रस्सी वॅन डर ड्युसेनने सर्वाधिक १२९ धावांची खेळी केली होती, तर कर्णधार टेंबा बावुमाने ११० धावांचे योगदान दिले होते. २९७ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून शिखर धवनने सर्वाधिक ७९ धावांची खेळी केली, तर विराट कोहलीने ५१ आणि शार्दुल ठाकूरने नाबाद ५० धावांचे योगदान दिले. परंतु, भारतीय संघाला ५० षटकांअखेर अवघ्या २६५ धावा करण्यात यश आले.

महत्वाच्या बातम्या :

‘पालघर एक्सप्रेस’चा दक्षिण आफ्रिकेत बोलबाला!! ‘हा’ पराक्रम करणारा शार्दुल एकमेव भारतीय

बीबीएल पदार्पणातच उन्मुक्त चंद फेल; लामिछानेने असं फसवलं फिरकीच्या जाळ्यात, पाहा व्हिडिओ

हे नक्की पाहा:

२०११ विश्वचषक भारताचे हिरो, ज्यांचे योगदान आज कोणाला आठवत नाही | India's Unsung heroes of 2011WC

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---