टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याला वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विश्रांती देण्यात आली होती (WI vs IND). त्याचवेळी, पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत पंतचे पुनरागमन झाले असून, पहिल्या टी-२० सामन्यात रिषभ पंतने फलंदाजीत काही खास कामगिरी केली नसेल, परंतु या सामन्याच्या पहिल्या डावात रिषभ पंतने एक विशेष कामगिरी केली आहे. रिषभ पंत यावर्षी अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
खरं तर, वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात (WI vs IND) टीम इंडियाने ६८ धावांनी विजय मिळवला आहे. त्याचवेळी, या सामन्यात टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने भलेही आपल्या बॅटने कोणतीही मोठी खेळी खेळली नसेल, परंतु या सामन्यात त्याने एक विशेष स्थान मिळवले. पंतने या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये आपल्या १००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या आहेत. यासह तो यावर्षी १००० धावांचा आकडा गाठणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. श्रेयस अय्यरचे नाव २०२२ मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आहे, ज्याने ८६६ धावा केल्या आहेत, तर सूर्यकुमार यादव ५३३ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात (WI vs IND) टीम इंडियाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना १९० धावा केल्या. त्यामुळे या सामन्यात भारतीय चाहत्यांना टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तो चाहत्यांच्या अपेक्षा धुडकावताना दिसला आणि अवघ्या १४ धावांची स्वस्त खेळी खेळून बाद झाला. १०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विंडीज संघाचा गोलंदाज पॉलने शॉर्ट थर्ड मॅनवर हुसैनच्या हाती पंतला झेलबाद केले. यादरम्यान पंतने १२ चेंडूत १४ धावांची छोटी खेळी खेळली. मात्र, ही खेळी पंतच्या नावावर गर्वाची छाप सोडजणारा विक्रम नोंदवण्य्साठी पुरेसी ठरली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दुसऱ्या टी२० सामन्यापूर्वी करणार ‘ही’ खास तयारी! खुद्द विंडीजच्या कर्णधारानेच सांगितलंय
VIDEO | शून्यावर बाद झालेल्या ‘अय्यर’ला मिळायलाच हवे ‘या’ चार धावांचे श्रेय!
‘ती असती तर आम्ही…’, पहिल्या टी२० पराभवानंतर रेणूका सिंगने व्यक्त केलं दु:ख