सध्या भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या कारणास्तव रद्द झालेली मालिका पूर्ननियोजित मालिका सुरू आहे. या मालिकेतील ५वा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारताच्या वरच्या फळीतील फलंदाजांच्या असफलतेनंतर यष्टीरक्षक फलंदाज आणि सध्या संघाचा उपकर्णधार रिषभ पंत एकावर एक विक्रम रचण्यास व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
बर्मिंगहॅम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. यामध्ये भारतीय संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत आहे. यादरम्यान टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. ९८ धावांवर भारताने पाच विकेट गमावल्या. मात्र यानंतर रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी डाव सांभाळला आणि भारताची धावसंख्या २५० धावांच्या पुढे नेली. यादरम्यान पंतने शतक तर जडेजाने अर्धशतक झळकावले. पंतने तीन खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.
सर्वात जलद २००० धावा करणारा यष्टीरक्षक फलंदाज
रिषभ पंत कसोटी सामन्यात सर्वात जलद २००० धावा करणारा यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी महेंद्रसिंग धोनी आणि सय्यद किरमाणी यांनीही कसोटी सामन्यात २००० धावांचा टप्पा पार केला आहे. यासोबतच पंतने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. आशियाबाहेर भारतासाठी सर्वात वेगवान कसोटी शतकाच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यामध्ये वीरेंद्र सेहवाग पहिल्या तर मोहम्मद अझरुद्दीन पहिल्या स्थानावर आहे.
इंग्लंडमध्ये दोन शतक झळकावणारा पहिला यष्टीरक्षक फलंदाज
याशिवाय रिषभ पंत इंग्लंडच्या धर्तीवर दोन शतके झळकावणारा जगातील पहिला बाहेरील देशातील यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. याआधी कोणत्याही देशाच्या यष्टीरक्षकाला इंग्लंडमध्ये ही कामगिरी करता आलेली नाही.
एकाच वर्षात दोन शतके
टीम इंडियाचा प्रतिभावान खेळाडू पंत एका कॅलेंडर वर्षात दोन शतके झळकावणारा यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. वृद्धिमान साहानेही त्याच्याआधी ही अप्रतिम कामगिरी केली आहे. २०१७ मध्ये साहाने हे चमत्कार केले होते. तर धोनीने हा पराक्रम २००९ मध्ये केला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अवघ्या चोविसाव्या वर्षी रिषभ पंतने मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा ‘हा’ विक्रम, वाचा एका क्लिकवर
INDvENG। पॉट्सने थेट त्रिफळा उडवत केला कोहलीच्या ७१व्या शतकाच्या स्वप्नाचा चुराडा
INDvENG। पाचवा कसोटी सामना सुरू, वाचा काय आहे पहिल्या चार सामन्यांचा निकाल