भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकत्याच संपलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला २-१ अशा फरकाने पराभूत करत ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. युवा यष्टीरक्षक रिषभ पंतने आक्रमक फलंदाजी करत या ऐतिहासिक मालिका विजयात निर्णायक भूमिका वठवली. पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या मालिकेपूर्वी पंत नुकताच भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीसोबत दिसला. धोनीची पत्नी साक्षी हीने इंस्टाग्रामवर या भेटीचे छायाचित्र शेअर केले आहे.
धोनीसह दिसला पंत
इंग्लंड विरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी सध्या भारतीय क्रिकेट संघाचा सर्वोत्तम यष्टिरक्षक असलेला रिषभ पंत भारताचा माजी यष्टीरक्षक व सर्वकालीन महान कर्णधार एमएस धोनीसमवेत दिसून आला. धोनीची पत्नी साक्षी हीने आपल्या इंस्टाग्रामवरून या भेटीचे छायाचित्र सार्वजनिक केले. साक्षी कायम सोशल मीडियावर व्यस्त असते. या छायाचित्रात धोनी, पंत व साक्षी दिसून येत आहेत. सदर छायाचित्रात धोनी डोक्यावर हॅट घातलेला दिसून येत आहे. तर, रिषभ पंतने कार्टूनची छपाई असलेला हुडी घातलेला दिसतोय. साक्षीने या छायाचित्राला ‘मिस यु गाईज’ असे कॅप्शन दिले आहे.
https://www.instagram.com/p/CKgcKbeHhDg/?utm_source=ig_web_copy_link
धोनीचा उत्तराधिकारी मानला जातो पंत
रिषभ पंतला एमएस धोनीचा उत्तराधिकारी मानला जाते. धोनी सारखीच आक्रमक फलंदाजी शैली असलेला पंत सध्या भारतीय संघाचा प्रमुख खेळाडू बनला आहे. वनडे व टी२० क्रिकेटमध्ये जलवा दाखवल्यानंतर पंतने कसोटी संघात देखील आपली जागा पक्की केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ मध्ये रिषभने देखणी कामगिरी केली. मालिकेतील अखेरच्या कसोटीत भारतीय संघाला विक्रमी धावांचे लक्ष्य पार करून देण्यात रिषभने ८९ धावांची नाबाद खेळी करत सिंहाचा वाटा उचलला. सिडनी येथील कसोटी अनिर्णित ठेवण्यात ही रिषभने ९३ धावा करत हातभार लावलेला.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! सौरव गांगुलीची तब्येत पुन्हा बिघडली; हॉस्पिटलमध्ये दाखल
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : तामिळनाडूचा विजयरथ सुसाट, हिमाचल प्रदेशचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक
व्हिडिओ : मोहम्मद रिजवानने करून दिली जॉन्टी रोड्सची आठवण, सूर मारत केला जबरदस्त रन-आऊट