21 फेब्रुवारीपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला (2 Matches of Test Series) सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला (Rishabh Pant) सल्ला दिला आहे.
गुरुवारी (20 फेब्रुवारी) पंतला सल्ला देताना रहाणे म्हणाला की, “पंत खराब परिस्थितीतून जात आहे हे त्याला मान्य करावे लागेल. तसेच एक चांगला क्रिकेटपटू होण्यासाठी त्याला प्रयत्न करावा लागेल.”
22 वर्षीय पंत मागील 5 महिन्यांपूर्वी सर्व क्रिकेट प्रकारात यष्टीरक्षक म्हणून भारतीय संघाची पहिली पसंती राहिला होता. परंतु पंतच्या खराब कामगिरीमुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील हे स्थान भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलकडे (KL Rahul) गेले. तसेच कसोटीत यष्टीरक्षणाची (Wicket Keeping) जबाबदारी वृद्धिमान साहाकडे (Wriddhiman Saha) गेली.
“तुम्ही कोणत्या ठिकाणी उभे आहात हे तुम्हाला स्विकारावे लागेल. सकारात्मक राहून जास्तीत जास्त शिकण्याची गरज आहे. याठिकाणी गोष्ट सीनियर किंवा ज्यूनियरची नाही,” असे कसोटी सामन्यापूर्वी रहाणे म्हणाला.
पंत सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. पंतला न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 आणि वनडे मालिकेतील एकाही सामन्यात खेळवण्यात आले नव्हते. यावेळी राहुलने यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडली होती.
“कोणालाही संघाबाहेर बसविणे चांगले वाटत नाही. परंतु हे मान्य करावे लागेल की, संघाला त्या दिवशी कशाची गरज आहे. प्रत्येक खेळाडूसाठी परिस्थिती मान्य करणे महत्त्वाचे आहे. आपण जे नियंत्रित करू शकतो, त्यावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसेच एक क्रिकेटपटू म्हणून मेहनत करावी लागेल,” असेही यावेळी खेळाडूंबद्दल बोलताना म्हणाला.
न्यूझीलंडविरुद्ध 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 21 फेब्रुवारीपासून वेलिंग्टन येथे सुरु होणार आहे. या सामन्यासाठी पंतला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण या कसोटी मालिकेसाठी साहा संघात आहे.
जगातील सर्वात मोठे स्टेडियम भारतात! बीसीसीआयने शेअर केला फोटो
वाचा????https://t.co/3JtoENwg7y????#म #मराठी #Cricket #TeamIndia #MoteraStadium— Maha Sports (@Maha_Sports) February 19, 2020
रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी ही आहे खुशखबर…
वाचा- ????https://t.co/5Zisfy7rx0????#म #मराठी #Cricket #TeamIndia @ImRo45— Maha Sports (@Maha_Sports) February 20, 2020






