---Advertisement---

रिषभ पंतला पुढील धोनी होण्यासाठी १५ वर्षे लागतील – सौरव गांगुली

On: शुक्रवार, डिसेंबर 6, 2019 7:44 PM
---Advertisement---

बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला (Rishabh Pant) खराब कामगिरीमुळे बऱ्याचवेळा टीकांना सामोरे जावे लागले होते. मात्र भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांनी त्याचे समर्थन केले होते.

त्याचबरोबर आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguli) पंतला एक सल्ला दिला आहे. गांगुलीने म्हटले आहे की पंतने मैदानावर ‘धोनी,धोनी’ ऐकायची सवय लावून घ्यायला पाहिजे आणि भारताकडून खेळताना दबावाचा सामना करण्यासाठी स्वत: च मार्ग शोधायला पाहिजे.

विराटने नुकतेच म्हटले होते की पंत अपयशी ठरला तर स्टेडियममधील चाहत्यांनी धोनीचे नाव घेऊन ओरडू नये हे आपमानास्पद आहे.

मात्र गांगुली ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’मध्ये म्हणाला, “पंतसाठी हे चांगले आहे. त्याला याची सवय झाली पाहिजे. त्याला हे ऐकू द्या आणि या टीकांना सामोरे जाण्यासाठी मार्ग शोधू द्या. त्याला स्वतःच या दबावापासून मार्ग काढावा लागेल.”

तसेच धोनीच्या भविष्याविषयी बीसीसीआयची योजना उघड करण्यास गांगुलीने नकार दिला. तो म्हणाला की पंतला पुढील धोनी होण्यासाठी पुढची 15 वर्षे सातत्यपूर्ण खेळावे लागेल.

तसेच “धोनीसारखे खेळाडू दररोज जन्म घेत नाहीत. धोनीने जे काही केले ते साध्य करण्यासाठी पंतला 15 वर्षे लागतील,” असे गांगुली म्हणाला.

“भारतीय क्रिकेटसाठी धोनीने जे काही केले आहे, त्याचे बीसीसीआयने कितीही आभार मानले तरी ते कमीच होईल. आम्ही विराट आणि निवडकर्त्यांशी बोलत आहोत. जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही धोनीच्या भविष्याबद्दल बोलू,” असेही गांगुली म्हणाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---