---Advertisement---

‘प्रसिद्धीसाठी खोटं बोलतेस, माझ्या मागे लागू नको’, उर्वशी रौतेलाला रिषभ पंतने ऐकवली खरीखोटी

On: गुरूवार, ऑगस्ट 11, 2022 3:49 PM
rishabh pant and urvashi Rautela
---Advertisement---

क्रिकेट आणि बॉलिवुड हे नाते तसे जुने आहे. अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवुडमधील अभिनेत्रींसोबत सुखी संसार थाटला आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा उल्लेख यामध्ये प्रामुख्याने करावा लागेल. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि बॉलिवुडच अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्यातील संबंधाविषयी देखील अनेकदा बातम्या समोर येत असतात. सध्या पंत आणि उर्वशी यांची चर्चा पुन्हा सुरू आहे. कारण आहे उर्वशीने एका मुलाखतीत केलेले वक्तव्य आणि त्यावर रिषभ पंतकडून आलेले प्रत्युत्तर.

उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत जे वक्तव्य केले, त्यातून असे समोर आले होते की, पंत तिला भेटण्यासाठी दिल्लीला आला होता. पण तिला वेळ नसल्यामुळे पंतसोबत तिची भेट झाली नाही. उर्वशीने बोलताना रिषभ पंत (Rishabh Pant) याचे नाव जरी घेतले नसले तरी, नेटकऱ्यांनी काढायचा तो अर्थ काढला आहे. दरम्यान, रिषभ पंतनेही तिच्या या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिल्याचे समजते. पंतच्या इंस्टाग्राम स्टोरिचा एक स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांच्या मते पंतने काही मिनिटांमध्येच ही स्टोरी डिलिट केली.

पंतने या स्टोरीमध्ये लिहिले आहे की, “किती मजेशीर बाब आहे की, काही लोक लोकप्रियतेसाठी मुलाखतीत खोटे बोलतात, जेणेकरून हे हेडलाईमध्ये येतील. हे खूप वाईट आहे की, हे लोक प्रसिद्धीसाठी किती भुकेले आहेत. देव त्यांना सुखी ठेवो. माझा पिछा सोड ताई! खोटं बोलण्यालाही सीमा असतात.” असे सांगितले जात आहे की, पंतने ही स्टोरी सात मिनिटांनंतर डिलिट केली.

तत्पूर्वी उर्वशी मुलाखतीत म्हटलेली की, “मी वाराणसीमधून शुटिंगसाठी दिल्लीला आले होते, जिथे माझा शो होता. मी पूर्ण दिवस शुटिंग केली. १० तास काम केल्यानंतर मी परत आले आणि झोपी गेले. ‘मिस्टर आरपी’ आले आणि लॉबीमध्ये बसून माझी वाट पाहू लागले. त्यांनी मला १७ पेक्षा जास्त वेळा फोन केला. नंतर मी त्यांना म्हटले की, मुंबईत येऊन माझ्याशी बोला.”

उर्वशीने सांगितल्याप्रमाणे नंतर या दोघांची भेटही झाली. तिने या मुलाखतीत कुठेच पंतचे नाव स्पष्टपणे घेतले नाही, मात्र ज्या पद्धतीने ती बोलली, ते पाहून पंतच्या चाहत्यांमध्ये नक्कीच नाराजी तयार झाली आहे. सोशल मीडियावर अनेकजन उर्वशीविषयी प्रतिक्रिया देत आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

टी२० लीगसाठी चेन्नई सुपर किंग्जची नवी फ्रॅंचायजी दाखल, धोनी असू शकतो मेंटर

धवनच्या कॅप्टन्सीखाली झिम्बाब्वेशी भिडेल भारत, लाईव्ह टेलिकास्ट ते स्केड्यूलपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

फिरकीपटूंसाठी मोठी बाधा आहे ‘हा’ पाकिस्तानी खेळाडू, आशिया चषकात संधी देण्याची होतीये मागणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---