---Advertisement---

तुझे वजन २०-२५ किलो जास्त आहे म्हणणाऱ्या वेडला रिषभ पंतचे जबरदस्त प्रत्युत्तर, म्हणाला..

On: गुरूवार, डिसेंबर 31, 2020 8:25 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेला दुसरा कसोटी सामना अत्यंत रोमांचक ठरला. या ऐतिहासिक सामन्यात भारताने सांघिक कामगिरी करत ८ विकेट्सने ऑस्ट्रेलियाला चितपट केले. यासह चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने १-१ ची बरोबरी साधली आहे. मालिकेतील उर्वरित सामने नव्या वर्षात खेळवले जातील. भारत-ऑस्ट्रेलिया संघातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यादरम्यान भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅथ्यू वेड यांच्यात स्लेजिंग होताना दिसली.

सुरुवातीला पंतने काढली होती खोड

झाले असे की, प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेच्या धुव्वादार शतकी खेळीमुळे भारताने पहिल्या डावात १३१ धावांची आघाडी घेतली होती. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावामधील २५ वे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह आला होता. यावेळी वेड स्ट्राइकवर असल्याने पंत त्याला डिवचण्याचा प्रयत्न करत होता. वेडने पहिला चेंडू खेळल्यानंतर पंत त्याच्याकडे बघून जोरात हसायला लागला. यावेळी वेड देखील पंतकडे बघून हसत म्हणाला, ‘तू स्वतःला मोठ्या स्क्रीनवर बघितलस का, तुझे वजन २० ते २५ किलो जास्त आहे ‘.

https://twitter.com/cricketcomau/status/1343406403189272581?s=20

रिषभ पंतची प्रतिक्रिया

वेडच्या या विधानावर आता पंतने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “मी आमच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीचा पुरेपूर आनंद लुटला. परंतु माझ्या मते वेडला थोडेफार संभाषण करायचे होते. कारण त्याला त्याच्या फलंदाजीवर जास्त लक्ष केंद्रित करायचे होते. पण मला त्याला असे करू द्यायचे नव्हते. म्हणून मी त्याला जास्त वेळ माझ्या संभाषणात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला.”

यापुर्वीही दिसला होता स्लेजिंग करताना

पंतने सामन्यादरम्यान विरोधी संघाच्या खेळाडूंसोबत शाब्दिक वाद घालण्याची ही पहिली वेळ नव्हती. २०१८-१९ मध्ये जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी पंत आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज टीम पेन यांच्यात मैदानावर स्लेजिंग बघायला मिळाली होती. त्यावेळी टीम पेनने पंतला बेबी सिटींग करायला सांगितले होते. त्याच्यात झालेल्या या शाब्दिक चकमकीची नंतर खूप चर्चा रंगली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

तुझं वजन जरा २० ते २५ किलो जास्तच! वेडचे पंतला मजेदार स्लेजिंग, पाहा व्हिडिओ

‘या’ खेळाडूच्या मते उर्वरित दोन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा संघच विजयाचा दावेदार

“ऑस्ट्रेलियन फलंदाजीत ‘ही’ सर्वात मोठी उणीव”, सचिन तेंडुलकर यांनी केले स्पष्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---