नव्या वर्षात सुरू होत असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे व टी20 मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. वनडे संघाचे नेतृत्व रोहित शर्मा तर टी20 संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या हा करताना दिसेल. असे असताना या संघात अनेक महत्त्वाचे बदल पाहण्यास मिळाले. मागील बऱ्याच काळापासून संघात यष्टीरक्षकाची भूमिका बजावणार रिषभ पंत या दोन्ही मालिकांसाठी संघात आपली जागा बनवण्यात अपयशी ठरला.
माध्यमांच्या अहवालानुसार, पंत दुखापतग्रस्त झाला आहे. तो गुडघ्याला झालेेल्या दुखापतीमुळे त्रस्त आहेे आणि त्याला नॅशनल क्रिकेट ऍकेेडमी येथे जाण्यास सांगितलेे आहे. तो 2 आठवड्यांच्या पुनर्वसनसाठी एनसीएमध्ये जाणार आहे. मात्र, बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही अधिकारिक घोषणा झालेली नाही. परंतु, त्याच्या दुखापतीचे कारण हे त्याचे वाढते वजन असल्याचे बोलले जातेय.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, रिषभ खरेच गुडघ्याच्या दुखापतीने, त्रस्त असेल तर की त्याच्या वाढत्या वजनाची समस्या आहे. खेळाडूंचे वजन वाढल्यास त्यांना दुखापती होत असतात. तसेच त्यामुळे गुडघेदुखीचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्याने लवकरच वजन कमी करणे गरजेचे आहे. त्यासाठी योग्य आहार व ट्रेनिंग त्याला घ्यायला लागेल.
पंतने यावर्षी 24 टी20 सामने खेळताना 21.35 च्या सरासरीने 363 धावा केल्या. यामध्ये केवळ एका अर्धशतकाचा समावेश होता. वनडे क्रिकेटमध्ये यावर्षी त्याने 12 वनडेच्या 10 डावात 336 धावा केल्या होत्या. त्याच्या यात सातत्याने होत असलेल्या खराब कामगिरीमुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्याची मागणी केली जात होती. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये त्याने एकट्याच्या जीवावर सामने भारताला जिंकून दिले आहेत. सध्या भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून अनेक पर्याय दिसून येतात. या मालिकेसाठी केएल राहुल व ईशान किशन हे वनडे मालिकेचा भाग आहेत. तर, संजू सॅमसन हा टी20 मालिकेत खेळताना दिसेल.
(Rishabh Pant Overweight Probleming His Career)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेविरुद्ध भारत करणार नव्या वर्षाचे स्वागत! जाणून घ्या मालिकेचे वेळापत्रक, संघ एकाच क्लिकवर
सूर्यासाठी वर्षाचा शेवट गोड! भारताच्या टी20 उपकर्णधार पदानंतर मिळाले आयसीसी पुरस्काराचे नामांकन