---Advertisement---

काय करावं ते सुचेना! सराव सामन्यात रिषभ पंतच्या तुफानी खेळीनं गोलंदाजांच्या मनात भरली धडकी

On: रविवार, जून 2, 2024 11:04 AM
---Advertisement---

टीम इंडिया यावर्षी दुसऱ्या टी20 विश्वचषक विजेतेपदाच्या शोधात आहे. भारतीय संघाला विजेतेपद पटकवायचं असेल तर संघातील काही खेळाडूंना चांगली कामगिरी करणं अत्यंत गरजेचं आहे. यातीलच एक नाव म्हणजे रिषभ पंत. टीम इंडियानं शनिवारी (1 जून) बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळला. रिषभ पंतनं या सामन्यात जे केलं, ते पाहून इतर संघांच्या मनात निश्चितच धडकी भरली असेल यात शंका नाही!

रिषभ पंतचा 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण कार अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. यामुळे तो जवळपास दीड वर्ष क्रिकेटपासून दूर राहिला. त्यानं आयपीएल 2024 द्वारे मैदानावर पुनरागमन केलं आणि आता तो आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास सज्ज झाला आहे. बांगलादेश विरुद्धच्या सराव सामन्यात त्यानं याची झलक दाखवून दिली.

बांगलादेशविरुद्ध न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात रिषभ पंतनं शानदार खेळी करत अर्धशतक झळकावलं. त्यानं 32 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 53 धावा केल्या. अर्धशतक पूर्ण करून पंत रिटायर्ड झाला. या खेळीदरम्यान पंत त्याच्या नेहमीच्या जुन्या शैलीत दिसला. त्यानं ज्या प्रकारचे शॉट्स खेळले, ते आश्चर्यचकित करणारे होते. पंतनं फाइन लेग आणि डीप स्क्वेअर लेगवर उभ्या-उभ्या फटके मारले, जे पाहून बांगलादेशचे खेळाडूही आश्चर्यचकित झाले होते.

या डावातील सर्वोत्तम गोष्ट म्हणजे रिषभ पंतचा आत्मविश्वास. पंतनं ज्या आत्मविश्वासानं फलंदाजी केली, ते पाहण्यासारखं होतं. पंत जर अशीच फलंदाजी करत राहिला, तर इतर संघांच्या गोलंदाजांना काहीच संधी मिळणार नाही. तो किती धोकादायक फलंदाज आहे हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे जर विश्वचषकात रिषभ पंतची बॅट तळपली, तर भारताला जेतेपद पटकवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

हार्दिक पांड्यानं मारलेला चेंडू थेट हातावर येऊन लागला! बांगलादेशच्या गोलंदाजाला जबर दुखापत

अमेरिकेतही रोहित शर्माची क्रेझी फॅन फॉलोइंग! भेट घेण्यासाठी चाहता थेट घुसला मैदानात; पाहा VIDEO

सराव सामन्यात बांगलादेशला हाणला! हार्दिक पांड्याचा अष्टपैलू खेळ, रिषभ पंतही चमकला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---