---Advertisement---

‘बेबीसिटर’ पंत! संघ-सहकाऱ्याच्या मुलासोबत खेळताना दिसला टोपीचा अनोखा खेळ, पाहा क्यूट व्हिडिओ

Pant-Playing-With-Rajveer
---Advertisement---

भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याला त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जातो. नुकताच तो घरच्या मैदानावर झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतही धुव्वादार फटकेबाजी करताना दिसला होता. त्याच्या काही ताबडतोब खेळींमुळे भारतीय संघाने या मालिकेत पाहुण्या श्रीलंकेला २-० ने व्हाईटवॉश दिला आहे. त्याच्या प्रदर्शनासाठी त्याला मालिकावीर पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

याच पंतची एक दुसरीही बाजू आहे. त्याला लहान मुलांसोबत वेळ घालवायला खूप (Babysitter Pant) आवडते. काही दिवसांपूर्वीच तो भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma’s Daughter) याची मुलगी समायरासोबत वेळ घालवताना दिसला होता. आता त्याने आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) मधील आपल्या एका संघ सहकाऱ्याच्या लहानग्या मुलासोबत मस्ती करताना दिसला आहे. दिल्ली फ्रँचायझीने या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पंत त्याचा नवा संघ सहकारी मनदिप सिंग (Mandeep Singh) याचा १ वर्षीय मुलगा राजवीर सिंग (Rajveer Singh) याच्यासोबत खेळताना दिसला आहे. दिल्ली संघाने मेगा लिलावात मनदिपला १ कोटी १० लाख रुपयांना विकत घेतले होते. आयपीएल २०२२ चा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे सर्व खेळाडू सरावासाठी मुंबईमध्ये एकत्र जमू लागले आहेत. अशात मनदिपही त्याच्या कुटुंबासोबत दिल्ली संघासोबत गेला आहे. यादरम्यान पंत त्याच्या मुलासोबत मस्ती करताना (Rishabh Pant Playing With Rajveer Singh) दिसला आहे.

https://www.instagram.com/reel/CbKjlEkJzxY/?utm_source=ig_web_copy_link

दिल्ली फ्रँचायझीने शेअर केलेल्या व्हिडिओत दिसते की, पंत, अक्षर पटेल आणि मनदिपचा मुलगा राजवीर हे मजेशीर खेळ खेळत आहे. राजवीर सतत पंतच्या डोक्यावरील टोपी काढतो आणि ती टोपी त्याला परत घालण्याचा प्रयत्न करतो. मात्र सुरुवातीला त्याला पंतला टोपी घालण्यात अपयश येते. शेवटी तो योग्यरित्या पंतच्या डोक्यावर टोपी घालतो आणि तिथून निघून जातो. पंतनेही त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

https://www.instagram.com/p/Ca9_WA-pne-/?utm_source=ig_web_copy_link

यापूर्वीही पंतने स्वतःच्या इंस्टाग्राम खात्यावरून रोहितची मुलगी समायरासोबतचे फोटो शेअर केला होता. फोटोत पंत समायरासोबत एका पानावर चित्र काढताना दिसत होता. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये पंतने रोहितची पत्नी रितिकाला टॅग करून ‘कॅप्शन पाहिजे’ असे लिहिले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

युझवेंद्र चहलने राजस्थान रॉयल्सचे ट्वीटर अकाउंट केले हॅक? स्वत:लाच फ्रँचायझीचा बनवले नवा कर्णधार

भारत चौरंगी मालिका खेळण्यास तयार झाला नाही, तर काय करणार पाकिस्तान? रमीज राजाने केले स्पष्ट

विराटसाठी आरसीबीने पाठवलेली चक्क मोडलेली कार, तर इतर खेळाडूंचा चांगली गाडी, वाचा तो किस्सा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---