---Advertisement---

सर्वोत्तम क्षेत्ररक्षणासाठी रिषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि अर्शदीप सिंग यांना नामांकन, कोणाला मिळालं पदक?

On: सोमवार, जून 10, 2024 1:01 PM
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024 चा 19वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये खेळला गेला. पाकिस्तान हा सामना जिंकण्याच्या अगदी जवळ होता, मात्र टीम इंडियानं जोरदार पुनरागमन करत अनपेक्षित विजय मिळवला.

या विजयाचा सर्वात मोठा हिरो राहिला जसप्रीत बुमराह, ज्यानं चार षटकात अवघ्या 14 धावा देत 3 बळी घेतले. यामध्ये बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांसारख्या मोठ्या विकेट्सचाही समावेश आहे. या विजयानंतर भारतीय संघ ‘अ’ गटात अव्वल स्थानी पोहोचला आहे.

सामना संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी क्षेत्ररक्षण पदक प्रदान केलं. विशेष म्हणजे, हे पदक देण्यासाठी टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये आले होते.

टी. दिलीप यांनी सर्वप्रथम या सामन्यातील टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षणाचं कौतुक केलं. यानंतर त्यांनी सूर्यकुमार यादव, रिषभ पंत आणि अर्शदीप सिंग यांना सर्वोत्तम कॅचसाठी नामांकित केलं. सूर्यकुमार यादवनं स्लीपमध्ये बाबर आझमचा उत्कृष्ट झेल घेतला. तर रिषभ पंतनं विकेटच्या मागे फखर झमानचा शानदार झेल घेतला. अर्शदीप सिंगनं एका अप्रतिम झेलद्वारे इमाद वसीमला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

टी दिलीप यांनी रवी शास्त्रींना भारतीय ड्रेसिंग रूममध्ये बोलावलं आणि रिषभ पंतनं सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचं पदक जिंकलं असल्याचं जाहीर केलं. यानंतर रवी शास्त्रींनी पंतबाबत भावनिक भाषण केलं, जे ऐकून तुमचंही मन भरून येईल. शास्त्री म्हणाले, “रिषभ पंतनं भीषण अपघातानंतर ज्याप्रकारे पुनरागमन केलं, ते करोडो लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्याच्या फलंदाजीबद्दल सर्वांनाच माहिती होती, परंतु त्यानं त्याच्या विकेटकीपिंगवर खूप काम केलं आहे.”

महत्त्वाच्या बातम्या – 

3 मोठ्या चुका ज्यामुळे पाकिस्ताननं जिंकलेला सामना गमावला
पाकिस्तानच्या पराभवानंतर ढसाढसा रडला नसीम शाह, मैदानावरचा व्हिडिओ व्हायरल
48 चेंडूत 48 धावा हव्या होत्या, 8 गडी बाकी होते; तरीही पाकिस्तानचा पराभव! भारतीय गोलंदाजांनी असा फिरवला सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---