भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत हा सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात खेळताना दिसतोय. साखळी फेरीच्या अखेरच्या सामन्यात त्याला संघात स्थान देण्यात आले होते. तसेच उपांत्य फेरीचा सामन्यातही तो खेळताना दिसला. या उपांत्य फेरीच्या सामन्यात मैदानावर उतरण्याआधी त्याने आयसीसीशी बोलताना आपल्या आवडत्या पाच टी20 क्रिकेटपटूंची नावे सांगितली आहेत.
इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्याआधी रिषभने आयसीसीशी गप्पा मारल्या. हा व्हिडिओ आयसीसीने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केला आहे. त्यावेळी त्याला आपल्या आवडत्या पाच टी20 क्रिकेटपटूंची नावे विचारण्यात आली. तेव्हा त्याने कारणांसह ही नावे दिली.
त्याने इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याला आपल्या संघात स्थान देताना म्हटले, “तो एक विध्वंसक फलंदाज आहे. जगातील कोणत्याही गोलंदाजाविरुद्ध तो मोठे फटके खेळण्यास घाबरत नाही.” त्याने इंग्लंडचा युवा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन याला देखील आपल्या संघात स्थान दिले. मागील दोन वर्षापासून तो जसा खेळत आहे तसा खेळ आपल्याला पाहायला आवडतो असे त्याने म्हटले. वेगवान गोलंदाज म्हणून त्याने भारताच्या जसप्रीत बुमराह याला संधी दिली. तर, अफगाणिस्तानच्या राशिद खान याचे कौतुक करत, तो गोलंदाजी व फलंदाजीत देत असलेल्या योगदानाबद्दल आपल्या आवडत्या खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश केला. तसेच, आपण स्वतः हा संघ निवडत असल्याने पाचवा खेळाडू म्हणून स्वतःचे नाव त्याने घेतले.
मागील काही काळापासून खराब फॉर्ममध्ये असला तरी रिषभला संघात जागा मिळालेली. परंतु, संघ व्यवस्थापनाने प्रथम पसंतीचा यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिकला संधी दिली. कार्तिक पहिल्या चार सामन्यात अपयशी ठरल्यानंतर पंतला झिम्बाब्वेविरूद्ध निवडले गेले. मात्र, तो या सामन्यात मोठी खेळी करू शकला नाही. तरी देखील उपांत्य फेरीसाठी तो संघात आपली जागा बनवण्यात यशस्वी ठरला. (Rishabh Pant Revealed His Top Five T20 Cricketers)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या विजयाने आयसीसी ट्रोल; चाहत्यांनी म्हटले, ‘दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडला पंचांच्या मदतीने…’
टी20मध्ये सर्वाधिक शतके, 14 अर्धशतके; इंग्लंडविरुद्ध भारताने पाडला धावांचा पाऊस, जाणून घ्या अव्वल कोण?