---Advertisement---

भन्नाटच! रिषभ पंतची बहीण इंग्लंडमध्ये करतेय मज्जा; व्हिडिओत दिसली झोका खेळताना

On: शनिवार, जून 19, 2021 1:05 PM
---Advertisement---

भारतात क्रिकेटपटूंबरोबर त्यांच्या परिवारातील सदस्यही क्रिकेट चाहत्यांच्या आकर्षणाचा विषय ठरतात. जसे युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा हिचे लाखो चाहते आहेत. तसेच भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतची बहिण साक्षी पंत हि सुद्धा सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. तिने नुकताच इंग्लंडमधील आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंतची बहिण साक्षी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. साक्षी पंतने शुक्रवारी (१८ जून) तिचे बरेचसे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. याशिवाय तिने एक व्हिडिओ क्लिपही शेअर केली आहे, ज्यात ती झोका खेळताना दिसत आहे.

साक्षी सध्या इंग्लंडमध्ये असून तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवत आहे. साक्षीने बरीच फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती कॉर्नवॉलमध्ये मजा करताना दिसत आहे. साक्षी इंग्लंडमध्येच शिकत आहे. ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे इंस्टाग्रामवर ९० हजारहून अधिक चाहते आहेत.

https://www.instagram.com/p/CQO6Y_Lsp6m/?utm_source=ig_web_button_share_sheet

https://www.instagram.com/reel/CQKz3Moji4o/?utm_source=ig_web_button_share_sheet

साक्षी आणि तिची आई सरोज यांच्यावर अलीकडेच त्यांच्या हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याने पगार न दिल्याचा आरोप केला होता. माध्यमांतील वृत्तानुसार, त्यांनी त्या कर्मचार्‍यास धमकीही दिली होती.

दुसरीकडे रिषभ पंतही सध्या भारतीय संघासमवेत इंग्लंडमध्ये आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी तो साऊथम्प्टनमध्ये आला आहे. भारतीय संघ हा अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. रिषभने भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर महत्वपूर्ण विजय मिळवून दिला होत. त्यानंतर त्याचे भारतीय संघाच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पथकातही स्थान पक्के झाले .

महत्वाच्या बातम्या

प्रशिक्षक, मार्गदर्शक अन् प्रेरक; भारतीय संघाच्या WTC प्रवासामधील ‘नायका’चा व्हिडिओ पाहिलाय का?

क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी! आज रंगणार आहे तब्बल १० सामन्यांचा थरार, पाहा वेळापत्रक

जेव्हा पावसामुळे तब्बल १२ दिवस चालला होता कसोटी सामना, तरीही नव्हता लागला निकाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---