इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामाची सुरूवात शानदार झाली असून १५ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात पृथ्वी शाॅच्या अर्धशतकाच्या मदतीने संघाने १५० धावांचे लक्ष्य लखनऊ समोर ठेवले. परंतु लखनऊने दिल्लीला ६ विकेट्सने पराभूत केले. दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत सामन्यानंतर नाराज झाला असून फलंदाजांवर भडकलेला दिसला. संघाचा या हंगामातील सलग दूसरा पराभव आहे.
सामन्यामंतर रिषभ पंत म्हणाला, “जेव्हा दव अशाप्रकारे असते, तेव्हा तुम्ही तक्रार करु शकत नाही. एक फलंदाज युनिटच्या रुपात आम्ही १०-१५ धावा कमी केल्या. शेवटी आवेश खान आणि जेसन होल्डरने पुनरागमन करण्याचा पुर्णपणे प्रयत्न केला, ज्याचे श्रेय त्यांना जाते.”
तो पुढे म्हणाला की, “दूसऱ्या डावाच्या सुरुवातीच्या अगोदर संघासोबत बोलणे झाले. मी म्हणालो होतो की, सामन्याच्या ४० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडू खेळापर्यंत आपल्याला १०० टक्के द्यायचे आहेत, मग परिणाम काहीही झाले तरी चालतील. पॉवर प्ले ठीक होता. आम्हाला एकही विकेट मिळाली नाही. आमच्या फिरकी गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये चांगली कामगिरी केली. परंतु शेवटी १०-१५ धावा कमी होत्या.”
दिल्लीने आपल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला ४ विकेट्सने पराभूत करत हंगामाची विजयी सुरुवात केली. पण, नंतर दूसऱ्या सामन्यात गुजरातने दिल्लीला १४ धावांनी पराभूत केले, तर तिसऱ्या सामन्यात लखनऊने संघाला ६ विकेट्सने पराभूत केले आहे. दिल्ली संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे.
लखनऊने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीचा स्टार फलंदाज पृथ्वी शाॅने ३४ चेंडूत ६१ धावा केल्या, यामध्ये ९ चौकारांचा आणि २ षटकारांचा समावेश होता. रिषभ पंतच्या ३९ आणि सरफराज खानच्या ३६ धावांच्या मदतीने संघाने २० षटकात ३ विकेट्स गमावत १४९ धावा केल्या. लखनऊच्या रवि बिश्नोईने २ विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊच्या क्विंटन डि काॅकने ५२ चेंडूत ८० धावा केल्या, ज्यामध्ये ९ चौकारांचा आणि २ षटकारांचा समावेश आहे. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. आयुष बदोनीने विजयी षटकार लगावला. दिल्लीकडून कुलदीप यादवने २ विकेट्स घेतल्या, तर ललित यादव आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कहर योगायोग! जन्मदिनाच्या तारखेएवढ्याच धावा कारकिर्दीत करणारा एकमेव खेळाडू
बाकीच्यांचं जाऊच द्या, पॅट कमिन्सच्या अफलातून खेळीवर पार्टनरही फिदा; म्हणाली, ‘वेलडन सुपरस्टार’