भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत सध्या आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याच्या कामगिरीपेक्षा यष्टीमागील बडबडीमुळे चांगलाच चर्चेत आहे. या मालिकेतील अॅडलेड येथे झालेल्या पहिल्या सामन्यातही त्याने पॅट कमिन्सला केलेल्या स्लेजिंगची चर्चा झाली होती.
त्याची यष्टीमागील हे सततचे बोलणे पर्थमधील दुसऱ्या कसोटी सामन्यातही पहायला मिळाले आहे. तो यष्टीमागून गोलंदाजांना प्रोत्साहन देत आहे. तसेच एकदा तर त्याने भारताचा पार्ट टाइम गोलंदाज हनुमा विहारीला त्याची गोलंदाजीची लेन्थ बदलायला सांग, असा चक्क कर्णधार विराट कोहलीलाच सल्ला दिला आहे.
पंत विराटला म्हणाला, ‘तो(विहारी) तूझ्या योजनेप्रमाणे गोलंदाजी करत आहे. त्याला फक्त सांग फलंदाजाला कट मारता येईल असा चेंडू टाक. अशाच चेंडूवर मार्कस हॅरिसही बाद झाला होता. त्याला सांग चेंडू पुढे टाक.’
विशेष म्हणजे विहारी डाव्या हाताच्या फलंदाजाला शॉर्ट चेंडू टाकत होता. ज्यावर शॉन मार्शने कट शॉट मारला होता आणि तो चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन पंतकडे गेला होता. पण पंतला तो झेल घेता आला नाही. त्याने तो सोपा झेल सोडला.
पण मार्शला मिळालेले हे जीवदान भारतासाठी जास्त धोकादायक ठरले नाही कारण विहारीच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये उभ्या असलेल्या अजिंक्य रहाणेने मार्शचा झेल घेत त्याला बाद केले.
पंतने आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या अॅडलेडमधील पहिल्या सामन्यात यष्टीमागे 11 झेल घेत यष्टीमागे एका कसोटी सामन्यात सर्वाधिक झेल घेण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. याआधी एबी डिव्हिलियर्स आणि जॅक रसल या माजी यष्टीरक्षकांनी एका सामन्यात 11 झेल घेण्याचा पराक्रम केला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
–भारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक?
–जेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय?
–विराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना
–मुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी