अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ४४ धावांनी जोरदार विजय मिळवला. यासह ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात फलंदाजी करताना पूर्णपणे फ्लॉप ठरलेल्या रिषभ पंतचा यष्टीमागे (Rishabh pant) जलवा पाहायला मिळाला आहे. त्याने एका अप्रतिम झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता. दरवेळेस मध्यक्रमात फलंदाजीला येणाऱ्या रिषभ पंतला यावेळी डावाची सुरुवात करण्याची संधी दिली होती. परंतु तो या संधीचा लाभ घेऊ शकला नाही, तो अवघ्या १८ धावा करत माघारी परतला. परंतु यष्टिरक्षण करताना त्याने अकील हुसेनचा एक भन्नाट झेल टिपला होता.
तर झाले असे की, २३८ धावांचा पाठलाग करताना ४० वे षटक टाकण्यासाठी शार्दुल ठाकूर गोलंदाजीला आला होता. त्यावेळी अकील हुसेन ३४ धावांवर फलंदाजी करत होता. या षटकातील दुसरा चेंडू शार्दुल ठाकूरने बाऊंसर चेंडु टाकला, तो चेंडू अकील हुसेनने लेग साईडच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा अंदाज चुकला आणि चेंडू बॅटचा कडा घेत यष्टिरक्षक रिषभ पंतच्या हातात गेला. तो चेंडू रिषभ पंत पासून भरपूर दूर होता, तरीदेखील त्याने डाईव्ह मारत भन्नाट झेल टिपला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय संघाने केल्या होत्या २३७ धावा
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं तर, या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने तुफानी फटकेबाजी करत ६४ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ४९ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ५० षटक अखेर ९ बाद २३७ धावा करण्यात यश आले होते.
वेस्ट इंडिज संघाला करता आल्या १९३ धावा
या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाकडून शरमार्ह ब्रूक्सने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. तर अकील हुसेनने ३४ धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिज संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १९३ धावांवर संपुष्टात आला होता. हा सामना भारतीय संघाने ४४ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या :
ज्यादा टेंशन नहीं लेने का! १८ धावांवर बाद होऊनही पंतभाऊ बिनधास्त बाउंड्रीवरच पडला आडवा- Photo
चुरशीच्या लढतीत यूपी योद्धांची बाजी, तमिळ थलाईव्हाजला २ गुणांनी चारली धूळ
रिषभने दुसऱ्या वनडेत उगाच दिली नाही सलामी, कर्णधार आणि प्रशिक्षकाने खूप विचारपूर्वक घेतलेला निर्णय