---Advertisement---

रिषभ पंतची विकेटकिपिंगमध्ये कमाल, घेतले हे दोन अफलातून झेल, पहा व्हिडिओ

---Advertisement---

दिल्ली। रविवारी(28 एप्रिल) फिरोजशहा कोटला स्टेडियमवर आयपीएल 2019 मधील 46 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडला. या सामन्यात दिल्लीने 16 धावांनी विजय मिळवला. याबरोबरच आयपीएल 2019 च्या प्लेऑफमध्ये प्रवेशही निश्चित केला आहे.

या सामन्यात दिल्लीकडून चांगले यष्टीरक्षण करताना रिषभ पंतने दोन महत्त्वाचे झेल घेतले आणि दिल्लीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने पहिला झेल हेन्रीक क्लासेनचा घेतला.

दिल्लीकडून 13 व्या षटकात अमित मिश्रा गोलंदाजी करत असताना दुसऱ्या चेंडूवर क्लासेनने यष्टीरक्षकाच्या डोक्यावरुन चेंडू मारण्याच्या योजनेने रॅम्प शॉट खेळला. पण चेंडू त्याच्या बॅटच्याकडेला लागून हेल्मेटला लागला. त्यामुळे चेंडू उंच उडाला आणि लेग साईडला गेला. त्याचवेळी पंतने पळत जात फुल लेंथ उडी मारत हा झेल घेतला.

त्यानंतर 19 व्या षटकात इशांत शर्मा गोलंदाजी करत असताना त्याने चौथा चेंडू फुल लेंथला ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. यावेळी फलंदाजी करत असलेल्या गुरकिरत सिंग मनच्या बॅटच्या पुढील भाग चेंडूला लागला आणि चेंडू यष्टीरक्षक रिषभ पंतच्या दिशेने गेला. पंतनेही चूक न करता उजवीकडे उडी घेत जलद गतीने एका हाताने झेल घेतला.

पंतने यष्टीरक्षणात जरी चांगली कामगिरी केली असली तरी मात्र त्याला फलंदाजीत खास काही करता आले नाही. तो 7 चेंडूत 7 धावा करुन बाद झाला. पण या सामन्यात दिल्लीने शिखर धवन(50) आणि कर्णधार श्रेयस अय्यरने(52) केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 187 धावा केल्या होत्या.

मात्र त्यानंतर 188 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बेंगलोरला 20 षटकात 7 बाद 171 धावाच करता आल्या. त्यामुळे बेंगलोरला 16 धावांनी पराभव स्विकारावा लागला.

https://twitter.com/Vidshots1/status/1122501859606814721

महत्त्वाच्या बातम्या –

कोलकता विरुद्ध मैदानात पाऊल ठेवताच रोहित शर्माच्या नावावर झाला हा खास विक्रम

…म्हणून ऍरॉन फिंचने मानले धोनी आणि कोहलीचे आभार

आयपीएल २०१९: प्लेऑफचे सामने सुरु होणार या नवीन वेळेत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment