रिषभ पंतचा दिल्ली कॅपिटल्स संघ गेल्या हंगामात आयपीएलचा उपविजेता होता. पण यावेळी संघ साखळी टप्प्यानंतर गुणतालिकेत अव्वल असूनही अंतिम फेरी गाठू शकला नाही. त्यांना पहिल्या क्वॉलिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि दुसऱ्या क्वालिफायरमध्ये कोलकाता नाइट रायडर्सने पराभूत केले. या पराभवामुळे दिल्लीचे पहिले आयपीएल जेतेपद मिळवण्याचे स्वप्न भंग पावले होते. दिल्लीच्या पराभवामुळे कर्णधार रिषभ पंतही खूप निराश झाला होता. या दुःखातून तो सावरत नाही, तोच सोशल मीडियावर तो ट्रोल व्हायला लागला आहे. याचे कारणही तितकेच विलक्षण आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार पंत याने ट्विट करून चुकून महानवमी ऐवजी रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली जाऊ लागली. एका चाहत्याने लिहिले की ‘भाई रामनवमी नाही, ती महानवमी आहे.’
दुसर्या एका चाहत्याने लिहिले की ‘भाऊ, याला रामनवमी नाही विजयादशमी किंवा दसरा असे म्हटले जाते.’ अजून एका चाहत्याने लिहिले की ‘रामनवमी एप्रिलमध्ये येते, तर शारदीय नवरात्रीमध्ये महानवमी होते.’ अजून एका चाहत्याने लिहिले की असे दिसते की रिषभभाईचे डोके आयपीएलमधील पराभवानंतर थोडं कमी काम करत आहे.
पंतच्या या ट्विटनंतर त्याच्यावर मीम्सचा पाऊस पडत आहे. रामनवमीचा उत्सव चैत्र महिन्यात (एप्रिल) साजरा केला जातो, तर महानवमी शारदीय नवरात्रीमध्ये येते. जो देवी दुर्गाच्या पूजेचा दिवस असतो. यानंतरच दसरा येतो, म्हणजेच विजयादशमी.
Ram navmi thodi hi hai wo to April me hoti hai
— Prashant Raghuwanshi (@_prashu_r412) October 14, 2021
What losing in Qualifiers does to our Spiderman
Sadme mein bhai bhool gaye ki aaj Mahanavami hai— Kisslay Jha🇮🇳 (@KisslayJha) October 14, 2021
https://twitter.com/theprayagtiwari/status/1448672820154671104
https://twitter.com/Chefly_abhinav/status/1448670771891478532
Maha Navami not bhai in Telangana we called it as Vijayadashami or dussara
— Mahesh Yadav🚩🇮🇳 (@king_okkadu) October 14, 2021
Mahanavami bhai Ram Navami nahin
— ER. HARIKRUSHNA SAHU/O+ (@er_harikrushna) October 15, 2021
ram navmi nahi hai bhai. Ram navmi chaitra m aati hai
— Momentum (@aai_omega) October 14, 2021
केकेआरविरुद्ध क्वालिफायर पराभव झाल्यानंतर पंतने आपल्या ट्विटर हँडलवरून एक भावनिक पोस्ट देखील शेअर केली आहे. सामन्यानंतरही पंत खूप भावूक झाला होता. पंतने आपल्या ट्विटरवर लिहिले, ‘हा एक हृदयद्रावक असा शेवट होता, पण असामान्य खेळाडूंनी भरलेल्या दिल्ली संघाचे नेतृत्व करण्यापेक्षा माझ्यासाठी अभिमानास्पद असे काहीही असू शकत नाही. आम्ही संपूर्ण हंगामात चांगला खेळ दाखवला आणि काही सामन्यात आमची कामगिरी थोडी कमकुवत होती पण आम्ही आमचे १०० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न केला होता.’
It ended in heartbreak last night, but I could not be more proud of leading this team of exceptional warriors. We battled hard through the season, and while we may have fallen short on some days, we always gave 100%. pic.twitter.com/IRPGqsmPT0
— Rishabh Pant (@RishabhPant17) October 14, 2021
रिषभ पंत प्रथमच दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत होता. या मोसमात पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली होती आणि गुणतालिकेत अव्वल राहत अगदी दिमाखात संघाने प्लेऑफमध्ये स्थान पटकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
केकेआरला अंतिम सामन्यात डोकेदुखी ठरणार चेन्नईचे ‘हे’ पाच ‘सुपर किंग्स’
धोनीला खेळताना पाहायची शेवटची संधी? चाहत्यांनी खरेदी केली लाखोंची तिकिटे; असे आहेत दर
आयपीएलमध्ये अंतिम सामन्यात सर्वाधिक वेळा पोहचणारे संघ; चेन्नई अव्वल क्रमांकावर, तर मुंबई…