भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा मागील वर्षीच्या अखेरीस कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला क्रिकेटपासून दूर राहावे लागत आहे. 25 वर्षीय रिषभ पंत हा आवश्यक औषधोपचार करून बरा होतोय. आयपीएल 2023 स्पर्धेला 31 मार्चपासून सुरुवात झाली असून, रिषभने आपला आयपीएल संघ असलेल्या दिल्ली कॅपिटलबद्दल एक ट्विट केले आहे.
दिल्ली कॅपिटल्स हंगामातील आपला पहिला सामना लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध खेळला. या सामन्याची प्लेईंग इलेव्हन जाहीर झाल्यानंतर पंतने एक ट्विट केले. त्याने प्लेईंग इलेव्हनच्या ट्विट खाली उत्तर देताना लिहिले,
I am 13 th player coz of impact rule otherwise would have been 12 th man 😊😊😊❤️
— Rishabh Pant (@RishabhPant17) April 1, 2023
‘इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे मला बारावा खेळाडू राहता येणार नाही. त्यामुळे मी तेरावा खेळाडू नक्कीच असेल.’ यावर अनेकांनी आम्ही देखील तुझ्या आगमनाची प्रतीक्षा करत आहोत असे म्हटले.
मागील वर्षी डिसेंबरच्या अखेरीस रुडकी येथे जाताना रिषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. तेव्हापासून तो मुंबई येथे उपचार घेत आहे. तसेच, तो क्रिकेटपासूनही दूर आहे. त्याच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होत असून, तो काठीच्या सहाय्याने चालताना देखील दिसतोय. आगामी विश्वचषकापर्यंत तो तंदुरुस्त होण्याची शक्यता वर्तवली जाते. आयपीएलच्या काही सामन्यांमध्ये तो दिल्लीच्या डग आऊटमध्ये असावा, अशी इच्छा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंग यांनी व्यक्त केलेली. यामुळे खेळाडूंचे मनोबल वाढेल असे त्यांनी म्हटलेले.
आयपीएलच्या या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार म्हणून डेव्हिड वॉर्नर तर उपकर्णधार म्हणून अक्षर पटेल यांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर रिषभचा बदली खेळाडू म्हणून बंगालचा युवा यष्टीरक्षक अभिषेक पोरेल याचा दिल्ली संघात समावेश केला गेलाय.
(Rishabh Pant Tweet About His Role For Delhi Capitals In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तुम्ही धोनीकडून अशी अपेक्षा करू शकत नाही…’, चेन्नईच्या पराभवानंतर सेहवागचे रोखठोक वक्तव्य
आयपीएल 2023 मध्ये दुसऱ्याच दिवशी कॅरेबियन तडका! मेयर्सने पदार्पणातच केली षटकारांची आतिषबाजी