आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी आता वातावरण तयार होऊ लागले आहे. भारतीय क्रिकेट संघाकडे या मेगा आयसीसी इव्हेंटमध्ये खेळण्यापूर्वी फक्त 3 एकदिवसीय सामने शिल्लक आहेत. जे भारत इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर खेळणार आहे. म्हणजेच टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी केवळ या 3 सामन्यांमध्ये सर्वोत्तम प्लेइंग 11 बनवाव्या लागतील.
वास्तविक पाहता, सध्या टीम इंडियासाठी काही ठीक चाललेले नाही. न्यूझीलंडकडून घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत व्हाईटवॉश झाल्यानंतर भारताला ऑस्ट्रेलियात जावे लागले. ज्यात बॉर्डर गावस्कर स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-1 असा मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. पण आता टीम इंडियाचे संपूर्ण लक्ष हा पराभव विसरून आणखी एक आयसीसी ट्रॉफी जिंकण्यावर असेल. येत्या काही दिवसांत भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफी संघही जाहीर होणार आहे. अशा परिस्थितीत आपण अशा खेळाडूबद्दल बोलणार आहोत ज्याची निवड होण्याची पूर्ण शक्यता आहे. पण त्याचे आकडे पाहून तुम्ही प्रभावित होणार नाही.
कार अपघातानंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या रिषभ पंतचा वनडे फॉरमॅटमध्ये विक्रम अजिबात चांगला राहिलेला नाही. 2018 पासून तो भारतासाठी केवळ 31 सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने 33.5 च्या सरासरीने 871 धावा केल्या आहेत. पंतने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक शतक आणि 5 अर्धशतके केली आहेत. पंत अजूनही एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्वत:ला पूर्णपणे सिद्ध करू शकलेला नाही.
इतकंच नाही तर अपघातातून परतल्यानंतर पंतने गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध फक्त एक वनडे खेळली होती. ज्यामध्ये त्याने केवळ 6 धावा केल्या होत्या. एवढे सगळे असले तरी रिषभ पंतला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संधी मिळणार हे जवळपास निश्चित आहे. कारण पंत हा टीम इंडियाचा पहिला पसंतीचा यष्टीरक्षक आहे. पण यावेळीही जर रिषभ एकदिवसीय फॉर्मेटमध्ये फ्लॉप झाला तर संघ त्याच्या जागी इतर खेळाडूंना नक्कीच संधी देऊ शकतो.
हेही वाचा-
गौतम गंभीरचं पद धोक्यात? बीसीसीआय लवकरच पाहणार रिपोर्ट कार्ड!
गिल ‘ओव्हररेटेड’ खेळाडू, त्याच्या जागी ऋतुराज….’, माजी क्रिकेटपटूने टीम इंडियाच्या ‘प्रिन्स’ला सुनावले
नशीब चमकलं..! ‘टी20’ आणि ‘कसोटी’नंतर या खेळाडूला ‘वनडे’ संघामध्येही मिळणार स्थान