भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक रिषभ पंत सध्या सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. तो थेट २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक २०२२ मधून भारतीय संघात पुनरागमन करेल. तरीही सध्या पंत चर्चेत आहे. त्याच्या चर्चेत असण्यामागचे कारण क्रिकेट नसून बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही आहे. उर्वशी नुकत्याच एका मुलाखतीत इशाऱ्यांमध्ये पंतबद्दल बोलली आहे, ज्यानंतर दोघांमध्ये सोशल मीडियावर शाब्दिक वाद सुरू आहेत. त्या दोघांंमधील वादाची चाहते मात्र चांगलीच मजा घेत आहेत.
पंत आणि उर्वशीमध्ये नेमके काय घडले?
उर्वशीने (Urvashi Rautela) काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत जे वक्तव्य केले, त्यातून असे समोर आले होते की, पंत तिला भेटण्यासाठी दिल्लीला आला होता. पण तिला वेळ नसल्यामुळे पंतसोबत तिची भेट झाली नाही. याप्रकरणी पंतने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे उर्वशीचे कान टोचले होते.
पंतने स्टोरीमध्ये लिहिले होते की, “किती मजेशीर बाब आहे की, काही लोक लोकप्रियतेसाठी मुलाखतीत खोटे बोलतात, जेणेकरून हे हेडलाईमध्ये येतील. हे खूप वाईट आहे की, हे लोक प्रसिद्धीसाठी किती भुकेले आहेत. देव त्यांना सुखी ठेवो. माझा पिछा सोड ताई! खोटं बोलण्यालाही सीमा असतात.” असे सांगितले जात आहे की, पंतने ही स्टोरी सात मिनिटांनंतर डिलिट केली होती.
Me waiting for Rishabh pant's reply on urvashi rautela's post:#UrvashiRautela #RishabhPant pic.twitter.com/PYZJtBhN3X
— Komedi Wali (@vegetarianmee) August 12, 2022
Most famous wars in 2022😅 #RishabhPant #Urvashirautela pic.twitter.com/dO5HheGC6z
— Ajay Motiramani (@MotiramaniAjay) August 11, 2022
Couple #breakup After #RishabhPant calling #UrvashiRautela "Behen" & She is calling Rishabh "Chotu Bhaiya"
Fans be like:- pic.twitter.com/uEzMPZAmSA
— Rakesh Arora (@Rakesh14_Arora) August 12, 2022
Uravashi saying Mr. RP in interview#RishabhPant be like#UrvashiRautela pic.twitter.com/SAtXcz1jFF
— Times of Maryada 🚜💪☀️ (@TMaryada) August 12, 2022
https://twitter.com/Vaibhav_m85/status/1557951279720460289?s=20&t=rFRkSoYjDx8cKxE3IS9PCg
त्याच्या या प्रतिक्रियेवर उत्तर देताना उर्वशीने त्याला छोटू भैया म्हटले. तिने ट्वीट करत लिहिले की, “छोटू भैयाने बॅट-बॉल खेळायला पाहिजे. मी कोणी मुन्नी नाही, जी तुझ्यासारख्या तरुण बालकासाठी बदनाम होईल.”
https://twitter.com/skipper_kohlii/status/1557924620711624704?s=20&t=Oa-m47V1SgQTUu2jEkFUmA
https://twitter.com/Tehseenqasim/status/1557929805609320453?s=20&t=S-oRWv4ViBXhobDEfX1Rdg
Mr. RP waited for 12 hours to meet me: Urvashi Rautela.
Mr. RP – I don't even wait for 3 balls to settle and smash the bowlers in test.😎😂#RishabhPant #UrvashiRautela pic.twitter.com/mpEnAoQGgg
— Manjeet Sharma 🇮🇳🚩 (@Hindumanjeet11) August 12, 2022
चाहत्यांनी बनवले भरपूर मीम्स
सोशल मीडियावर या दोघांमध्ये झालेल्या शाब्दिक युद्धानंतर चाहत्यांनी मीम्स व्हायरल करायला सुरुवात केली आहे. काही चाहत्यांनी मीम बनवत लिहिले आहे की, ‘उर्वशी म्हणतेय, पंतने माझ्यासाठी १० तास वाट पाहिली.
#UrvashiRautela #rishabhpant #RP17 pic.twitter.com/MnlFWYut4n
— Mehndi Gupta (@memesbymehndi) August 12, 2022
Urvashi Rautela 😂#UrvashiRautela #RishabhPant pic.twitter.com/98Dqjkb2ym
— आदित्य ब्राह्मण❤️🥂 (@Aditya_Brahman_) August 12, 2022
यावर पंत म्हणतो, मी तर कसोटी क्रिकेटमध्येही वाट बघत नाही. चौकार ठोकत सामना संपवतो.’ तर काहींनी उर्वशीला ट्रोल करत लिहिले आहे की, ‘उर्वशीने आता पंतला छोटू भेया म्हटले आहे, मग पंने तिला तिला मोठी बहिण म्हणायला पाहिजे, म्हणजे हा वाद असाच सुरू राहील.’
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
धवनसोबत धोका? केएल राहुल परतल्याने कॅप्टन्सीवरून हाकालपट्टी, अपमानावर भडकले चाहते
आफ्रिदीच्या दुखापतीमुळे पाकिस्तान चिंतेत, आशिया चषकापूर्वी होईल का बरा? कर्णधार म्हणतोय..