भारतीय क्रिकेट संघाने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शुबमन गिलची टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. गिलची उपकर्णधारपदी नियुक्ती हा अनेकांसाठी आश्चर्यकारक निर्णय होता. यापूर्वी, जून 2024 मध्ये खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकात हार्दिक पांंड्याला भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून निवडले होते. दरम्यान आता पाकिस्तानचे माजी फलंदाज बासित अली म्हणाले आहेत की, उपकर्णधार कोणीही झाले तरी टीम इंडियाचा पुढचा कर्णधार दुसराच असेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळायची आहे. एकदिवसीय मालिकेत शुबमन गिल टीम इंडियाचा कर्णधार म्हणूनही दिसणार आहे. गिलला उपकर्णधार होताना पाहून असे मानले जात आहे की रोहित शर्मानंतर तो टीम इंडियाचा पुढचा कर्णधार होऊ शकतो.
टीम इंडियाच्या पुढच्या कर्णधाराबद्दल बोलताना, बासित अलीने यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे नाव घेतले. त्यांनी पंतचे वर्णन धोनीसारखे केले. बासित अली म्हणाले की, जरी दुसरा कोणी उपकर्णधार असेल, रिषभ पंत हा कर्णधार असेल. आयपीएल 2025 साठी लखनऊ सुपर जायंट्सने पंतला कर्णधार बनवले आहे. त्यानंतर बासित अली यांनी पंतला भारताचा भावी कर्णधार म्हटले.
बासित अली त्यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाले, “लखनऊ सुपर जायंट्सने रिषभ पंतला कर्णधार बनवले. ही तुमच्यासाठी बातमी आहे. पण माझ्यासाठी नाही. माझ्यासाठी हे सामान्य आहे. कारण ज्या दिवशी त्याने सिडनी कसोटीत पत्रकार परिषद दिली, तेव्हा आम्ही तिथे म्हटले की आणखी एक एमएस धोनी आला आहे. भविष्यातील उपकर्णधार कोणही असो. पण रिषभ पंतला कर्णधार व्हायलाच हवे.”
हेही वाचा-
IND VS ENG; मालिकेपूर्वी मोठी घोषणा, दिल्लीच्या या खेळाडूची उपकर्णधारपदी निवड
IND VS ENG: टी20 क्रिकेटमध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड
‘हा जगाने पाहिलेला सर्वात महान व्हाईट बॉल क्रिकेटपटू …’, माजी कर्णधाराकडून विराटची पाठराखण?