fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

रिशांक देवाडीगा प्रो कबड्डीत अशी कामगिरी करणारा पहिलाच महाराष्ट्रीयन खेळाडू

प्रो कबड्डी सीजन ७ चा शेवटचा लेग ग्रेटर नोएडा येथे सुरू आहे. या लेगमध्ये काल (६ ऑक्टोबर) यूपी योद्धा विरुद्ध पुणेरी पलटण अशी लढत झाली. चुरशीच्या या सामन्यात यूपी योद्धाने ४३-३९ अशी बाजी मारली. या सामन्यादरम्यान यूपी योद्धाचा खेळाडू रिशांक देवाडीगाने प्रो कबड्डीत ६०० रेड गुणांचा टप्पा पार केला.

कालच्या सामन्यांत रिशांकने ७ रेड गुणांसह प्रो कबड्डीमध्ये ६०० रेड गुण पूर्ण केले. प्रो कबड्डीत अशी कामगिरी करणारा तो एकूण आठवा खेळाडु तर महाराष्ट्राचा पहिलाच खेळाडु ठरला.

रिशांकने ११८ सामन्यात ६०० रेड गुणांचा पल्ला पार केला. त्याचे आता प्रो कबड्डीत ६०२ रेड गुणांसह एकूण ६४८ गुण आहेत. त्यात २५ सुपररेड तर १० सुपर टेनचा समावेश आहे. रिशांक नंतर महाराष्ट्राकडून काशिलिंग अडकेचे ५६१ रेड गुण आहेत.

#प्रो कबड्डीत सर्वाधिक रेड गुण मिळवणारे महाराष्ट्राचे खेळाडू – 

६०२ रेड गुण*- रिशांक देवडीगा

५६१ रेड गुण- काशिलिंग अडके

४०७ रेड गुण- सिद्धार्थ देसाई

३६७ रेड गुण- श्रीकांत जाधव

३१२ रेड गुण- निलेश साळुंके

You might also like