दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघात ५ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. ही मालिका सध्या रोमांचक स्थितीत आहे. ही मालिका २-२ अशी बरोबरीत आहे. अशात रविवारी (१९ जून) एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलोर येथे दोन्ही संघात पाचवा आणि अखेरचा टी२० सामना होणार आहे, जो निर्णायक असेल. या मालिकेत नियमित कर्णधार रोहितच्या आणि उपकर्णधार राहुलच्या अनुपस्तिथीत कर्णधारी करताना रिषभ पंतला त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याच्यावर टीका होत असताना माजी पाकिस्तानी खेळाडू दानिश कनेरियानेही पंतवर टीका केली आहे.
माजी पाकिस्तानी खेळाडू दानिश कनेरियाने रिषभ पंतच्या फिटनेसवर प्रश्न उभे केले आहेत. तो म्हणाला की,’ मी रिषभ पंतच्या यष्टीरक्षणावर बोलु इच्छितो. पंतला त्याच्या वजनामुळे नीट वाकता सुद्धा येत नाहीये. मी ध्यान दिले आहे की त्याला वेगवान गोलंदाजांच्या गोलंदाजीवर खाली वाकत सुद्धा नाही. तो आपल्या पायांच्या बोटांवरच बसतो. असे वाटते की त्याचे वजन जास्त असल्यामुळे त्याला बसल्यावर लवकर उभे देखील राहता येत नाही. तो १००% फिट आहे का?
तो पुढे म्हणाला की,’पंतला कर्णधार म्हणुन हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक यांची साथ लाभली. त्याचा फायदा त्याला झाला. त्याचबरोबर गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी कमाल दाखवली. पंतला भारताचा कर्णधार म्हणुन दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारतात पहिल्यांदाच मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे. ‘
या मालिकेत ऋषभ पंतची बॅट पूर्णपणे शांत आहे. या मालिकेत तो संघासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरत आहे. ४ सामन्यांमध्ये पंतने १४ च्या सरासरीने आणि १०५ च्या स्ट्राईक रेटने बॅटने ५७ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये फक्त ६ चौकार आहेत. ऑफ स्टंपबाहेरील चेंडूवर मोठे फटके खेळण्यासाठी तो सतत बाद होत असतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘गुजरात टायटन्सचा ‘हा’ खेळाडू विश्वचषकात खेळण्यासाठी योग्य नाही,’ आशीष नेहराने केली भविष्यवाणी
भारताचं नशीबं गंडलयं राव! पुन्हा एकदा टॉस जिंकत आफ्रिकेचा गोलंदाजी करण्याचा निर्णय