मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात मंगळवारी (३ मे) झालेल्या ४८ व्या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सला ८ विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात गुजरातची फलंदाजी फारशी चमकलेली दिसली नाही. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याची बॅटही शांत होती. त्याला ऋषी धवन याने बाद करत खास सेलिब्रेशनही केले.
या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, गुजरातने ४ विकेट्स केवळ ६७ धावांवर गमावल्या होत्या. यात हार्दिक पंड्याच्या विकेटचाही (Hardik Pandya Wicket) समावेश होता. तो केवळ ७ चेंडूत एक धाव करून बाद झाला. त्याला ७ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ऋषी धवनने (Rishi Dhawan) बाद केले.
जेव्हा ऋषी धवनने ७ व्या षटकातील दुसरा चेंडू टाकला, तेव्हा तो पंड्याच्या बॅटची कड घेत यष्टीरक्षक जितेश शर्माच्या हातात गेला. त्यामुळे पंड्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. ऋषी धवननेही पंड्याची विकेट घेताच फ्लाईंग किस देत सेलिब्रेशन (Flying Kiss Celebration) केले. त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
https://twitter.com/addicric/status/1521505398297006081
हार्दिक बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलरही ११ धावा करून बाद झाला. त्यानंतर राहुल तेवतिया आणि साई सुदर्शन यांनी ४५ धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण तेवतियाही ११ धावांवर बाद झाला. पण साई सुदर्शनने नाबाद ६५ धावांची खेळी करत गुजरातला २० षटकांत ८ बाद १४३ धावांपर्यंत पोहचवले. पंजाबकडून कागिसो रबाडाने शानदार गोलंदाजी करताना सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
त्यानंतर पंजाबने गुजरातने दिलेले १४४ धावांचे आव्हान १६ षटकातच पूर्ण केले. पंजाबकडून शिखर धवनने अर्धशतक करत नाबाद ६२ धावा केल्या. तसेच भानुका राजपक्षेने आक्रमक खेळत ४० धावा केल्या. त्याचबरोबर लिव्हिंगस्टोनने १० चेंडूत नाबाद ३० धावांची खेळी केली. गुजरातकडून मोहम्मद शमी आणि लॉकी फर्ग्यूसनने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
तेवतियाचा चालू सामन्यातच संघसहकारी साई सुदर्शनवर संताप, वाचा नक्की झालं तरी काय
लिव्हिंगस्टोनने चौथ्या क्रमांकावर का केली फलंदाजी? मयंक अगरवालचा मोठा खुलासा
अबब! लिव्हिंगस्टोनचा ११७ मीटरचा षटकार अन् गोलंदाजासह कर्णधारही चकीत; राशिदने तर बॅटही तपासली