पुणे। अजिंक्य क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजीत स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर क्रिकेट करंडक स्पर्धेत साखळी फेरीत रायझिंग चॅम्पियन संघाने विशाल क्रिकेट क्लब संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
एके क्लब, साळुंबरे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत फरझान शेखच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर रायझिंग चॅम्पियन संघाने विशाल क्रिकेट क्लब संघाचा 4 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना शुभम पडवळच्या 26 तर अशुतोष सुतारच्या 23 धावांसह विशाल क्रिकेट क्लब संघाने 20 षटकात सर्वबाद 120 धावा केल्या. 120 धावांचे लक्ष रायझिंग चॅम्पियन संघाने 16.5 षटकात 6 बाद 124 धावा करून पुर्ण केले. फरझान शेखने 40 चेंडूत 7 चौकार व एका षटकारासह नाबाद 55 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. यात अदित्यने 19 तर राम धायगुडेने 16 धावा करून फरझानला सुरेख साथ दिली. फरझान शेख सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
विशाल क्रिकेट क्लब : 20 षटकात सर्वबाद 120 धावा(शुभम पडवळ 26(19, 4×4, 1×6), अशुतोष सुतार 23(31, 3×4), खालिद कुरेशी 15(13, 2×4), समंदर शिनवारी 2-26, फरझान शेख 2-19) पराभूत.वि रायझिंग चॅम्पियन : 16.5 षटकात 6 बाद 124 धावा(फरझान शेख नाबाद 55(40, 7×4, 1×6), अदित्य आर 19(26, 1×4), राम धायगुडे 16(12, 2×4, 1×6), खालिद कुरेशी 4-25, प्रतिक उन्हाळे 1-28) सामनावीर- फरझान शेख
रायझिंग चॅम्पियन संघाने 4 गडी राखून सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
दिग्गजाला सुचलीये भन्नाट आयडिया! भारत-पाकसह ‘या’ देशांमध्ये टी२० मालिका भरवण्याचा देणार प्रस्ताव
“कोहलीसारखा फलंदाज मिळणे कसोटी क्रिकेटचे भाग्य” महिला इंग्लिश क्रिकेटपटूने गायले गुणगान
‘हे’ ५ अनकॅप्ड खेळाडू आयपीएल २०२२ मध्ये करू शकतात पदार्पण, यादीत एक वेगवान गोलंदाजही सामील