भारतीय अ संघ सध्या विंडीज दौऱ्यावर असून त्यांचा विंडीज अ संघाविरुद्ध 5 सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी(14 जूलै) सर विवियन रिचर्ड्स स्टेडीयम, अँटिग्वाला पार पडला. या सामन्यात भारताने 65 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारताच्या या विजयात ऋतुराज गायकवाड आणि शुबमन गिलने अर्धशतकी खेळी करत तर नवदीप सैनीने 5 विकेट्स घेत महत्त्वाचा वाटा उचलला आहे.
या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले होते. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 255 धावा केल्या. भारताकडून ऋतुराजने 102 चेंडूत 85 धावा केल्या. तर शुबमनने 83 चेंडूत 62 धावा केल्या. तसेच कर्णधार मनिष पांडे(27), इशान किशन(24) आणि हनुमा विहारीने(23) थोडीफार लढत दिली.
विंडीजकडून रोमारियो शेफर्डने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच अकिम जोर्डन, रेमॉन रेफर, राहकिम कॉर्नेल आणि खारी पिएरने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
त्यानंतर 256 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला 43.5 षटकात सर्वबाद 190 धावाच करता आल्या. त्यांच्याकडून रेमॉन रेफरने 71 धावांची एकाकी झुंज दिली. तसेच रोमारियो शेफर्ड(34) आणि सुनील अँब्रोस(24) यांनी छोटीखानी खेळी केली. मात्र अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही.
भारताकडून सैनीने 8.5 च्या षटकात 46 धावा देत सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तसेच राहुल चहरने 2, त्याचबरोबर खलील अहमद आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विंडीज दौऱ्यासाठी या दिवशी होणार टीम इंडियाची निवड; धोनीच्या भविष्याबाबत सस्पेन्स कायम
–विश्वचषकानंतर आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे क्रमवारीत या भारतीय खेळाडूंचा बोलबाला कायम
–सुपर ओव्हरदरम्यान बेन स्टोक्सने जोफ्रा आर्चरला दिला होता हा खास संदेश