आयपीएल 2023 सुरू होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. पण चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड याने पहिल्या दोन सामन्यांमध्येच आपला फॉर्म दाखवून दिला आहे. सीएसकेने हंगामातील पहिल्या दोन सामन्यांमधील एकात विजय, तर एका पराभव स्वीकारला आहे. पण हे दोन्ही सामने ऋतुराजसाठी खास ठरले. कारण त्याने दोन्ही वेळी अर्धशतक ठोकले. त्याची ही खेळी पाहून यावर्षी विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडीत निघणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) मधील आपल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाला गतविजेत्या गुजरात टायटन्सकडून 5 विकेट्सने पराभूत पराभव स्वीकारावा लागला होता. पण या सामन्यात सीएसकेसाठी सलामीवीर ऋतुराज गायकवाड () याने 92 धावांची वादळी खेळी केली होती. दुसऱ्या सामन्यात सीएसकेने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 12 धावांनी विजय मिळवला. यावेळीही ऋतुराजने 57 धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. या दोन सामन्यांनंतर त्याची सरासरी 74.50, तरत स्ट्राईक रेट 183.95 राहिला आहे. यादरम्यान 7 चौकार आणि 13 षटकात ऋतुराजच्या बॅटमधून निघाले.
आयपीएल 2021 प्रमाणे यावर्षीही ऋतुराज आयपीएलची ऑरेंज कॅप जिंकणार, असा अंदाज वर्तवला जात आहे. 2021 हंगामातील 16 सामन्यांमध्ये त्याने 136.26 च्या स्ट्राईक रेटने एकूण 635 धावा केल्या होत्या आणि ऑरेंज कॅपदेखील जिंकली होती. यावर्षी त्याचे प्रदर्शन 2021 पेक्षा अधिक आक्रमक दिसत आहे. अशात आयपीएल 2016 मध्ये विराट कोहली () याने केलेला विक्रम मोडण्यासाठी ऋतुराजला दावेदार मानले जात आहे. विराटने आयपीएल 2016 मध्ये 973 धावा केल्या होतत्या. आयपीएल इतिहासात एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराटच्याच नावावर आहे. यादीत दुसऱ्या क्रमांकावर जोस बटलर आहे, ज्याने मागच्या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना तब्बल 863 धावा कुटल्या होत्या. (Rituraj Gaikwad will break Virat Kohli’s biggest record in IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डिविलियर्सने पुन्हा दुखावली RCBच्या चाहत्यांची मने! म्हणाला, ‘हा’ संघच बनणार IPL 2023चा चॅम्पियन
‘आजचा सामना…’, केकेआर-आरसीबी सामन्याच्या काही तासांपूर्वीच भारताच्या माजी दिग्गजाची मोठी भविष्यवाणी