पॉंडेचेरी येथे खेळल्या जात असलेल्या देवधर ट्रॉफी स्पर्धेत मंगळवारी (1 ऑगस्ट) पश्चिम विभाग विरुद्ध पूर्व विभाग असा अखेरचा साखळी सामना खेळला गेला. या सामन्यात पूर्व विभागाचा अष्टपैलू रियान पराग याने शानदार शतक झळकावले. त्याचे हे या स्पर्धेतील दुसरे शतक आहे. आयपीएलनंतर त्याच्यावर होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील टीकेला त्याने याद्वारे उत्तर दिले.
देवधर ट्रॉफीच्या अखेरच्या दिवशी साखळी फेरीतील तीन सामने खेळले गेले. पश्चिम विभाग विरुद्ध पूर्व विभाग अशा झालेल्या या सामन्यात विजय होणाऱ्या संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळणार होते. आघाडीचे फलंदाजांनी शानदार खेळ दाखवत संघाला चांगली सुरुवात दिली होती. त्यानंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पराग याने आक्रमण केले.
अवघ्या पाच दिवसात दुसरे शतक झळकावताना त्याने 68 चेंडूंचा सामना करताना 102 धावांची खेळी केली. यामध्ये 6 चौकार व 5 षटकारांचा समावेश होता. त्याने कुमार कुशाग्रंसोबत 140 धावांची भागीदारी करून संघाला 319 धावांपर्यंत मजल मारून दिली. त्यानंतर गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत संघाला मोठा विजय मिळवून देत अंतिम फेरीत प्रवेश केला.
त्याने या स्पर्धेत पाच दिवसांपूर्वी उत्तर विभागाविरुद्ध शतक झळकावले होते. या सामन्यात त्याने त्याने 102 चेंडूत 131 धावा चोपल्या होत्या. या धावा करताना त्याने 5 चौकार आणि तब्बल 11 चौकारांचा पाऊस पाडलेला. काही दिवसांपूर्वी झालेल्या इमर्जिंग एशिया कपमध्ये देखील गोलंदाजी तो चमकला होता. यावर्षी आयपीएलमध्ये त्याच्याकडून संघाला मोठी अपेक्षा असताना तो एकाही सामन्यात वीस धावांच्या पुढे जाऊ शकला नव्हता. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करतो.
(Riyan Parag Hits Another Century In Deodhar Trophy 2023)
महत्त्वाच्या बातम्या-
लग्नाच्या 1 महिन्यातच बदललं नशीब; वेगवान गोलंदाजाचे एक वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन
रिंकूचे नशीब फळफळले! 18 दिवसात 2 वेळा मिळाली टीम इंडियात जागा; म्हणाला, ‘दररोज 6 तास…’