भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना 7 ऑगस्ट रोजी कोलंबोमध्ये खेळवला जाईल. या मालिकेत पाहुणा भारतीय संघ 1-0 ने पिछाडीवर आहे. पहिला वनडे सामना बरोबरीत सुटला होता, तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या मालिकेत भारतीय संघाकडून आतापर्यंत अत्यंत खराब फलंदाजी पाहायला मिळाली आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. पण आता तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल पाहायला मिळू शकतात.
तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी भारतीय संघ जोरदार सराव करत आहे. आता सराव सत्राचे काही फोटोही सोशल मीडियावर समोर आले आहेत. या फोटोंमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे खेळाडू दिसले नाहीत, पण रिषभ पंत आणि रियन पराग हातात बॅट धरलेले नक्कीच दिसले. त्यानंतर तिसऱ्या वनडे सामन्यात धाकड युवा अष्टपैलू रियन पराग आणि यष्टीरक्षक रिषभ पंतला संधी मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
Pictures from practice session
– Rohit Sharma didn’t bat or field
– Riyan and Rishabh did open nets
– Shreyas and KL also practiced☄️Rishabh Pant and Riyan Parag were practising at nets when the 2nd ODI was going on.#CricketTwitter #RishabhPant pic.twitter.com/vKqESjVRdO
— Riseup Pant (@riseup_pant17) August 6, 2024
या खेळाडूंनी आतापर्यंत निराशा केली
वनडे मालिकेतील दोन सामने खेळले गेले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, शिवम दुबे या खेळाडूंनी संघ आणि चाहत्यांची निराशा केली आहे. या खेळाडूंमध्ये केएल राहुलने सर्वाधिक निराश केले आहे. पहिल्या सामन्यात राहुलने अतिशय संथ खेळी खेळली आणि संघाला त्याची गरज असताना तो बाद झाला. या सामन्यात राहुलने 23 चेंडूत 23 धावा केल्या. यानंतर राहुलला दुसऱ्या वनडेत खातेही उघडता आले नाही. अशातच अखेरच्या वनडे सामन्यात राहुलच्या जागी रिषभ पंतला संधी दिली जाऊ शकते. दुसरीकडे अष्टपैलू शिवम दुबेही विशेष खेळ दाखवू शकला नाही. अशातच त्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये रियान परागची वर्णी लागू शकते.
श्रीलंकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली
या मालिकेत आतापर्यंत श्रीलंकेकडून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे श्रीलंकेने तीन सामन्यांच्या मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता श्रीलंकेला तिसरा सामना जिंकून मालिका 2-0 ने जिंकायची आहे. तर भारतीय संघ शेवटचा सामना जिंकून मालिका वाचवण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
पृथ्वी शॉ वेधतोय प्रशिक्षक गंभीरचं लक्ष! वनडे कप स्पर्धेत 44 चौकारांच्या मदतीने केल्यात 294 धावा
बांगलादेशचा हिंदू क्रिकेटपटू लिटन दासचं आंदोलकांनी खरंच घर पेटवलं का? जाणून घ्या सत्य
आयपीएल 2025च्या हंगामात बदलणार 6 संघांचे कर्णधार?