आयपीएल (IPL) 2025चा आगामी सीझन सुरु होण्यासाठी अजून बराच वेळ बाकी आहे, पण त्याआधीच अनेक आश्चर्यकारक बातम्या समोर येत आहेत. आयपीएल 2025पूर्वी, त्या हंगामासाठी एक मेगा लिलाव होणार आहे. मेगा लिलावापूर्वी सर्व 10 संघांना त्यांच्या सोडलेल्या आणि कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे. तत्पूर्वी यादरम्यान, सोशल मीडियावर मोठे दावे केले जात आहेत की, आयपीएल 2025मध्ये 6 संघांचे कर्णधार बदलणार असल्याच्या चर्चा होत आहेत.
आयपीएल 2025मध्ये 6 संघांचे नवे कर्णधार असतील असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. या दाव्यावर विश्वास ठेवला तर मुंबई इंडियन्स (MI) हार्दिक पांड्याकडून (Hardik Pandya) कर्णधारपद काढून पुन्हा रोहित शर्माकडे (Rohit Sharma) नेतृत्व सोपवेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) पुन्हा एकदा विराट कोहलीला (Virat Kohli) त्यांच्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्याची शक्यता आहे.
लखनऊ सुपर जायंट्स (LSG), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), मुंबई इंडियन्स (MI), गुजरात टायटन्स (GT), पंजाब किंग्ज (PBKS) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांना नवा कर्णधार मिळणार असल्याच्या चर्चा होत आहेत. मुंबईची कमान रोहित शर्माकडे, बंगळुरूची कमान विराट कोहलीकडे, राजस्थानची कमान जोस बटलरकडे, लखनऊची कमान निकोलस पूरन, गुजरात रशीद खानकडे जाईल आणि पंजाब किंग्जची कमान नितीश राणाकडे जाईल. असा दावा केला जात आहे. पण अधिकृत माहिती आल्याशिवाय कोणतेही दावे गृहीत धरले जाऊ शकत नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट की बाबर कोण आहे उत्कृष्ट फलंदाज? ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचे खळबळजनक वक्तव्य
1820 दिवसांनंतर तुटणार युनिव्हर्स बॉसचा मोठा विक्रम! रोहित शर्मा ठरणार अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा फलंदाज
नीरज चोप्राची फायनलमध्ये धमाकेदार एँन्ट्री, पहिल्याच प्रयत्नात केला भीमपराक्रम!