---Advertisement---

धोनी पाठोपाठ कोहलीची देखील क्रेझ! राजस्थानच्या खेळाडूने सामना संपल्यावर घेतला ऑटोग्राफ

---Advertisement---

आयपीएल २०२१चा १६वा सामना काल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये खेळवला गेला. या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगलोरच्या संघाने एकतर्फी विजय मिळवला. राजस्थानने दिलेले १७८ धावांचे लक्ष्य बंगलोरने एकही गडी न गमावता पूर्ण केले आणि त्यासह यंदाच्या आयपीएल हंगामातील सलग चौथा विजय नोंदवला.

या सामन्यानंतर देखील आयपीएलच्या कुठल्याही सामन्यांनंतर दिसणारे चित्र दिसून आले. सामना संपल्यावर दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांशी गप्पा मारतांना आणि हास्यविनोद करतांना दिसून आले. यातच एक खास क्षण देखील घडला, ज्याचा फोटो राजस्थान रॉयल्सच्या संघाने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.

रियान परागचा ‘फॅन-बॉय’ क्षण
राजस्थान आणि बंगलोरचा सामना संपल्यानंतर सगळेच खेळाडू एकमेकांशी सामन्याबद्दल चर्चा करतांना तसेच गप्पा मारतांना दिसून येत होते. याच दरम्यान बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीची सही एक चाहता घेत असल्याचे दिसून आले. मात्र हा चाहता दुसरा-तिसरा कोणी नाही तर राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू रियान पराग होता.

रियान पराग हा कोहलीचा मोठा चाहता आहे. त्याने नेहमीच कोहलीला आपण ‘रोल मॉडेल’ मानत असल्याचे सांगितले आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्याला कोहली सारखा कव्हर ड्राइव खेळायला शिकायचे असल्याचे सांगितले होते. कोहलीचा असा कट्टर चाहता असल्याने त्याने कालच्या सामन्यानंतर त्याची सही घेण्याची संधी अजिबात दवडली नाही. कोहलीने देखील आनंदाने परागच्या बॅटवर सही करत त्याला शुभेच्छा दिल्या. राजस्थान रॉयल्सने ‘रियान परागची फॅन-बॉय मोमेंट’ अशी कॅप्शन देत हा फोटो शेअर केला आहे.

https://twitter.com/rajasthanroyals/status/1385482889085689859?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1385482889085689859%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-ipl-2021-virat-kohli-fulfils-riyan-parag-request-after-get-sign-of-bat-3992609.html

कोहलीने झळकवले हंगामातील पहिले अर्धशतक
दरम्यान, विराट कोहलीसाठी वैयक्तिकदृष्ट्या देखील राजस्थान विरूद्धचा सामना लाभदायक ठरला. या सामन्यात त्याने यंदाच्या हंगामातील पहिले अर्धशतक साकारले. त्याने ४७ चेंडूत नाबाद ७२ धावांची खेळी केली. यंदाच्या हंगामात उत्तम सुरुवात केलेल्या बंगलोरसाठी कर्णधाराचे फॉर्मात येणे, हे सुचिन्हच आहे. हाच फॉर्म कायम ठेवून संघाला यंदा पहिलेवहिले आयपीएल विजेतेपद मिळवून देण्याचा कोहलीचा प्रयत्न असेल.

महत्वाच्या बातम्या:

आकाशी ड्रेस अन् चेहऱ्यावर गोड स्माईल; मिसेस बुमराहच्या फोटोवर जस्सी घायाळ, दिली अशी रिऍक्शन

क्रिकेटपटूंनाही आवरला नाही धोनीचा ऑटोग्राफ घ्यायचा मोह; शाहरुख खानपाठोपाठ शेल्डन जॅक्सननेही शेअर केली फॅनबॉय मुमेंट

बाबो! पाकिस्तानी गोलंदाजाने इतका खतरनाक बाऊंसर टाकला की फलंदाजाच्या हेल्मेटचे झाले दोन तुकडे, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---