---Advertisement---

6 चेंडूत 6 षटकार, मिचेल स्टार्कची कारकीर्द उद्ध्वस्त करण्यावर अडला होता युवा भारतीय खेळाडू

On: बुधवार, जून 5, 2024 6:28 PM
---Advertisement---

आयपीएल 2024 च्या सुरुवातीच्या टप्प्यात कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची कामगिरी काही खास नव्हती. परिस्थिती अशी होती की तो आपल्या संघासाठी सतत महाग ठरत होता. मात्र, प्लेऑफ मध्ये त्याने आपण काय करू शकतो हे दाखवून दिले आणि केकेआर संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज रियान पराग आयपीएल 2024 मध्ये चांगल्या फाॅर्म मध्ये दिसला होता. आयपीएल 2024 चा हंगाम संपल्यानंतर आता त्याने मोठे वक्तव्य केले आहे. स्पर्धेदरम्यान त्याने स्टार्कविरुद्ध धोकादायक प्लॅन केला होता. आयपीएल संपल्यानंतर परागने रणवीर अल्लाबदियासोबत “बीअर बायसेप्सवर” खास संवाद साधला. यादरम्यान त्याने सांगितले की अंतिम सामन्यात त्याने स्टार्कच्या एका षटकात 6 षटकार मारण्याची प्लॅनिंग केली होती. मात्र त्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. कारण राजस्थान संघ अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला.

पराग म्हणाला, ‘मी खूप मोठे स्वप्न पाहिले होते. अंतिम सामन्यापासून आम्ही फक्त 2 सामने दूर होतो. अंतिम सामन्यात मिचेल स्टार्कच्या षटकात मला 6 षटकार मारायचे होते, असे मी ठरवले होते. आम्हाला 1 षटकात 36 धावा करायच्या आहेत आणि मी स्टार्कच्या षटकात 6 षटकार मारत आहे.

पराग पुढे म्हणाला, ‘मैदानात मला कोणत्या प्रकारचे शॉट्स मारायचे आहेत हे जाणून घेण्यासाठी मी माझ्या खोलीत पॅड घालून शॉट्सचा सराव करायचो. यामुळे मला आत्मविश्वास मिळाला. लोकांचा असा विश्वास आहे की स्वप्न पाहणे आणि ते प्रत्यक्षात आणणे वेगळे आहे. पण तुम्हाला याचा थोडा फायदा होतो. यामुळे तुमची मानसिकताही बदलते. असेही तो म्हणाला.

महत्तवाच्या बातम्या-

डेविड वाॅर्नरच्या निवृत्तीवर रिकी पाँटिंगनं दिली प्रतिक्रिया
टी20 विश्वचषकासाठी जय शहांची टीम इंडियासाठी खास संदेश, रोहित शर्माकडे केली ही मागणी
आयर्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी, रोहित शर्मानं दिली प्रतिक्रिया म्हणाला, “आयर्लंडविरुद्धचा सामना…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---