दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ सध्या संमिश्र कामगिरी करत आहे. मागील वर्षी झालेल्या टी20 विश्वचषकात एक मजबूत संघ उतरवलेला असताना त्यांना नेदरलँड्सकडून आश्चर्यकारक पराभव स्वीकारावा लागल्याने स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. या स्पर्धेनंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी राजीनामा दिलेला. त्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षकपद रिक्त होते. सोमवारी (16 जानेवारी) क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने मुख्य प्रशिक्षकपदाच्या या जागेसाठी दोन नावांची घोषणा केली.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने ट्विट करत माहिती देताना म्हटले,
‘दक्षिण आफ्रिका कसोटी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून शुक्री कॉनरॉड यांची नियुक्ती केली आहे. तर, मर्यादित षटकांच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रॉब वॉल्टर हे जबाबदारी सांभाळतील.’
Shukri Conrad (red-ball) and Rob Walter (white-ball) have been revealed as the new #Proteas head coaches 👏
We wish them all the best in their new roles 🇿🇦#BePartOfIt pic.twitter.com/E2PVE6ER4s
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 16, 2023
वॉल्टर यांनी यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघासह काम केले आहे. ते संघाचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते. गेल्या सात वर्षांपासून ते न्यूझीलंडमधील देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रशिक्षणाचे काम करतात. त्याचबरोबर कॉनरॉड यांना दक्षिण आफ्रिकेच्या देशांतर्गत क्रिकेटचा खूप अनुभव आहे. ते नुकतेच दक्षिण आफ्रिकेच्या अंडर 19 संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. 2023 च्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेला फक्त तीन कसोटी सामने खेळायचे असल्याने सुरुवातीला त्यांना फारसे काम नसेल. 28 फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असून, यासोबतच कॉनरॉड त्यांच्या प्रशिक्षक कारकिर्दीला सुरुवात करतील.
दक्षिण आफ्रिका संघाला पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. तसेच, यावर्षी भारतात वनडे विश्वचषक खेळला जाईल. दक्षिण आफ्रिका संघ प्रथमच विश्वचषक जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल.
(Rob Walter And Shukri Conrad New Coaches Of South Africa Cricket Team)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद नाद नादच! भारताचा 19 वर्षांखालील महिला विश्वचषकात विश्वविक्रम, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
‘रोहितलाही विराटसारखी वागणूक द्या…’, गौतम गंभारची मोठी प्रतिक्रिया