जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक फॉलोअर असलेला फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या खोलीत चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मेस्सी त्याचा क्लब पॅरिस सेंट जर्मनसाठी (पीएसजी) चॅम्पियन्स लीगचा सामना खेळून परत आल्यानंतर ही घटना घडल्याचे निदर्शनास आले. चोरांनी कथितपणे त्याच्या हॉटेलच्या खोलीत प्रवेश करत, दागिने आणि रोख रक्कम लुटली. ही घटना त्याच्या पॅरिसमधील पंचतारांकित हॉटेलच्या खोलीत घडली.
मेस्सी पत्नी अँटोनेला रोक्कुझो आणि त्यांच्या तीन मुलांसोबत या ठिकाणी राहत होता.
इतक्या मालमत्तेची झाली चोरी
पॅरिसमधील एका प्रमुख वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, ४० हजार डॉलर किमतीचे दागिने व १५ हजार पाउंड रोख रक्कम चोरीला गेली आहे. चोरांची टोळी हॉटेलच्या छतावरून मेस्सीच्या खोलीत घुसली. मेस्सी सध्या पॅरिसमधील लक्झरी हॉटेल ले रॉयल मॉन्सेओ येथे थांबला आहे. हॉटेलमधील ४ खोल्यांच्या रॉयल सुइटसाठी तो प्रति रात्र २३,००० डॉलर्स इतके भाडे देतो. सुइटच्या वरच्या खुल्या बाल्कनीतून चोर खोलीत आल्याच्या प्राथमिक अंदाज लावला जात आहे.
पीएसजीसाठी खेळतोय मेस्सी
जगातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉलपटू असलेला मेस्सी ऑगस्ट महिन्यापासून फ्रान्समधील प्रसिद्ध फुटबॉल क्लब पॅरिस सेंट जर्मनसाठी खेळत आहे. यापूर्वी तो स्पॅनिश क्लब बार्सिलोनाचा सदस्य होता. मेस्सीने नुकतेच चॅम्पियन्स लीगच्या सामन्यात मॅंचेस्टर सिटीविरुद्ध गोल करत पीएसजीच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
हे वर्ष ठरले संस्मरणीय
मेस्सीसाठी २०२१ हे वर्ष आत्तापर्यंत संस्मरणीय ठरले आहे. त्याच्या नेतृत्वात अर्जेंटिनाने कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तसेच तो या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. त्यानंतर, २२ वर्षानंतर तो बार्सिलोना संघाशी असलेले नाती तोडत पीएसजीमध्ये विक्रम किमतीत सहभागी झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
रोनाल्डोचा पुनरागमनात धमाका! मँचेस्टर युनायडेटकडून पहिल्याच सामन्यात २ गोल, आईला अश्रू अनावर
‘कोहलीला भेटण्यासाठी रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडमध्ये झाला सहभागी’, शुबमन गिलचे ट्वीट तुफान व्हायरल
थेट डोक्याने २ गोल करत ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा बनला G.O.A.T., केला ‘हा’ विश्वविक्रम