सध्या भारत आणि इंग्लंड या दोन संघात पाचवा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने धमाकेदार फलंदाजी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अशातच बुमराहने कसोटीच्या एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. या आधी हा विक्रम वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराच्या नावावर होता. त्यावेळी लाराने रॉबिन पिटरसनला एका षटकात २८ धावा चोपल्या होत्या. त्याच रॉबिन पिटरसनने आता ट्विट करत बुमराहला शुभेच्छा दिल्या आहेत.
साल २००३-०४ दरम्यान वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात ब्रायन लाराने पिटरसनला एका षटकात २८ धावा चोपल्या होत्या. तेव्हापासून हा लाजीरवाणा विक्रम पिटरसनच्या नावे होता. मात्र आता जवळपास १८ वर्षांनंतर हा विक्रम ब्रॉडच्या नावावर गेला आहे. त्यामुिळे पिटरसनने आनंदी होऊन एक ट्विट शे्र केले आहे. या ट्विटमध्ये त्याने “माझा विक्रम मोडला आहे, विक्रम हे मोडित येण्यासाठीच तयार होत असतात” असा आशय लिहीत ब्रॉडला टोमणा मारला आहे.
Sad to lose my record today 😜 oh well, records are made to be broken I guess. Onto the next one 🏏 #ENGvIND
— Robin John Peterson (@robbie13flair) July 2, 2022
दरम्यान, इंग्लंड विरुद्ध भारत पाचव्या कसोटी सामन्यात भाराताने प्रथम फलंदाज करत असताना १० गडी गमावत ४१६ धावा केल्या. या वेळी सुरुवातीला केवळ ९८ धावांवर भारताने ५ गडी गमावले होते. त्यानंतर मात्र, उपकर्णधार रिषभ पंत आणि रविंद्र जडेजाने डाव सावरला. दोघांनीही शतकी खेळी करत भारताला सन्मानजनक धावा उभारू दिल्या. त्यानंतर एशवटी बुमराहने एकाच षटकांत ३५ धावा करत ब्रॉडला गुडघे टेकायला भाग पाडले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करण्यापूर्वीच जो रुटने रचलाय इतिहास! जाणून घ्या सविस्तर
‘कर्णधार’ बुमराहचा फुल ऑन राडा! नाबाद ३१ धावांची तुफानी खेळी करत रचला इतिहास
पंत आणि जडेजाने काढला इंग्लंडचा घाम, एकाच डावात शतके ठोकत १५ वर्षांच्या कामगिरीची पुनरावृत्ती