---Advertisement---

निवृत्तीनंतरही उथप्पाने दाखवला दम! कॅपिटल्ससाठी अवघ्या इतक्या चेंडूत केली 79 धावांची वादळी खेळी

---Advertisement---

सध्या संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे इंटरनॅशनल लीग टी20 ही स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेमध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा हा दुबई कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. संघासाठी तो सलामीवीराची भूमिका बजावताना दिसतोय. सोमवारी (16 जानेवारी) दुबई कॅपिटल विरुद्ध गल्फ जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात उथप्पाने तुफानी खेळी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट व आयपीएलमधून निवृत्त झाल्यानंतर उथप्पा सध्या इंटरनॅशनल लीग टी20 स्पर्धेत खेळतोय. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या गल्फ जायंट्सविरुद्धच्या सामन्यात तो दुबई संघासाठी सलामीवीर म्हणून मैदानात उतरला. इंग्लंडच्या जो रूट याच्यासह त्याने सलामी दिली. या जोडीने पहिल्या गड्यासाठी केवळ 7.2 षटकात 71 धावा चोपल्या. यामध्ये रूटचे योगदान केवळ सहा धावांचे होते.

उथप्पाने या सामन्यात अतिशय आक्रमक खेळ दाखवताना 46 चेंडूवर अवघ्या 79 धावांचा तडाखा दिला. यामध्ये दहा चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 171 पेक्षा जास्त राहिला. दुबई कॅपिटल्ससाठी त्याच्याव्यतिरिक्त रॉवमन पॉवेलने 38 व सिकंदर रझाने 30 धावांचे योगदान दिले. त्यामुळे दुबई संघाने निर्धारित 20 षटकात 8 बाद 182 धावा केल्या.

उथप्पाने स्पर्धेतील पहिल्या सामन्यातही अशाच प्रकारे खेळी केली होती. त्याने अबुधाबी नाईट रायडर्सविरूद्ध 33 चेंडूत 43 धावा केलेल्या. उथप्पाने मागील वर्षी चेन्नई सुपर किंग्स संघासाठी आयपीएल खेळल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली होती. तत्पूर्वी, त्याने 11 वर्ष भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले.

(Robbin Uthappa Hits Fiery 79 For Dubai Capitals In International League T20)

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

नाद नाद नादच! भारताचा 19 वर्षांखालील महिला विश्वचषकात विश्वविक्रम, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
‘रोहितलाही विराटसारखी वागणूक द्या…’, गौतम गंभारची मोठी प्रतिक्रिया 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---