भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पानं चेन्नई सुपर किंग्जवर एक गंभीर आरोप केला आहे. चेन्नईनं न्यूझीलंडचा क्रिकेटपटू रचिन रवींद्रला सीएसकेच्या अकादमीमध्ये सराव करण्याची परवानगी दिली, यावरूव त्यानं संघावर टीका केली. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी रचिननं चेन्नई सुपर किंग्जच्या अकादमीमध्ये सराव केला होता. ग्रेटर नोएडा येथे अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी रवींद्र सीएसके अकादमीमध्ये गेला होता आणि तेथे त्यानं भारतीय परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी सराव केला होता.
सीएसकेच्या अकादमीत सराव करण्याचा निर्णय रचिन रवींद्रसाठी योग्य ठरला. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्यानं बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात 134 धावांची दमदार खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या डावात त्यानं नाबाद 39 धावा केल्या. या सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी रचिनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
हा पुरस्कार स्वीकारताना रचिननं चेन्नईत केलेल्या तयारीमुळे त्याच्या फलंदाजीत कशी मदत झाली, हे सांगितलं. उथप्पानं सीएसकेच्या अकादमीमध्ये सराव करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. देश नेहमीच फ्रेंचायझीच्या आधी येतो, असा घणाघात उथप्पानं केला.
उथप्पानं त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “रचिन रवींद्र येथे आला आणि त्यानं सीएसके अकादमीमध्ये सराव केला. सीएसके ही एक सुंदर फ्रँचायझी आहे, जी नेहमी आपल्या खेळाडूंची काळजी घेते. पण येथे एक मर्यादा राखावी लागेल. देशाचं हित तुमच्या फ्रँचायझी खेळाडूंच्या हितापेक्षा वरती असावं. विशेषत: जेव्हा तो परदेशी खेळाडू असेल आणि तुमच्या देशाविरुद्ध खेळायला आला असेल.”
रचिन रवींद्रनं तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडसाठी सर्वाधिक 256 धावा केल्या. या दरम्यान त्याची सरासरी 51.20 होती. या डावखुऱ्या फलंदाजाचे आई-वडील दीपा आणि रवी कृष्णमूर्ती हे बंगळुरूचे रहिवासी आहेत. त्याचे आजी आजोबा आजही बंगळुरूमध्ये राहतात.
हेही वाचा –
रिषभ पंतसाठी ऑस्ट्रेलियाचा खास प्लॅन, कर्णधार कमिन्सनं केला मोठा खुलासा
3 संघ जे आयपीएल 2025 मेगा लिलावात जेम्स अँडरसनवर लावू शकतात मोठी बोली
विदेशी भूमीवर विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाची बलाढ्य कामगिरी; पाहा आकडेवारी