भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने नुकताच ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या सामन्यादरम्यानचा श्रीशांत आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यामध्ये घडलेला एक मजेशीर प्रसंग उलगडला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या एका टी -20 सामन्यादरम्यान ही घटना घडली होती. दक्षिण आफ्रिकेतील टी 20 विश्वकरंडक स्पर्धा जिंकल्यानंतर आठवड्याभरातच भारताने हैदराबाद येथे एका टी 20 सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाचे यजमानपद भूषवले होते.
एका ऑनलाइन कार्यक्रमादरम्यान उथप्पा म्हणाला, “आम्ही ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध हैदराबादमध्ये खेळत होतो आणि माझ्या मते कदाचित अँड्रू सायमंड किंवा मायकल हसी धाव घेण्यासाठी थोडे पुढे आला होता. त्यावेळी श्रीसंत गोलंदाजी करताना थांबला व त्याने स्टंप हाताने बाजूला करत अंपायरकडे विकेटसाठी अपील केली. तेव्हा धोनी पळत त्याच्याकडे गेला आणि त्याला बाजूला ओढत म्हणाला की, भाऊ आता थेट गोलंदाजी कर. धोनीने श्रीसंतच्या आक्रमकपणाला अतिशय योग्यरीत्या हाताळले होते.” उथप्पाने या सर्व आठवणी कॉमेडियन सौरभ पंत बरोबर झालेल्या कार्यक्रमात सांगितल्या आहेत.
याबरोबर उथप्पाने टी-20 विश्वचषक 2007 मधील आठवणी सांगितल्या आहेत. 2007 टी 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तान विरुद्ध थरारक सामन्यात विजय मिळवला होता. शेवटच्या षटकात मिसबा उल हकने मारलेला तो फटका व श्रीसंतने घेतलेली ती कॅच संपूर्ण क्रिकेटविश्वात अजरामर ठरलेली आहे.
उथप्पा म्हणाला ,”मी लाँग ऑनवर उभा होतो. त्या सामन्यात अनेक घटना घडत होत्या. जेव्हा तो बॉल हवेत उडाला तेव्हा माझ्या मनात विचार आला की शॉर्ट फाइन लेगवर कोण उभा आहे. मी बघितले की श्रीसंत उभा आहे. मी प्रार्थना करत होतो की आम्ही यशस्वी होवो. कारण आम्ही वर्ल्डकप फायनल सामन्यात पाकिस्तानकडून हरायच्या मानसिकतेत नव्हतो. आम्ही नेहमीच वर्ल्डकपमध्ये त्यांच्याविरुद्ध विजय मिळवलेला आहे.”
हेही वाचा-
–भारतात टी२० विश्वचषक होणार की नाही? पाहा कोणत्या दिवशी होणार हा महत्त्वाचा निर्णय
–हे भारीयं! दरवेळी विकेट घेतल्यानंतर मोहम्मद शमी विराट कोहलीला विचारतो हा महत्त्वाचा प्रश्न
–विराटला नावे ठेवण्याआधी त्याने केलेले हे काम नक्की पाहा, पाहा आता कुणाच्या आलाय मदतीला
–विराट, एबी, मॅक्सवेलला ७ चेंडूत बाद करणाऱ्या त्या युवा गोलंदाजाने सांगितला सामन्याआधीचा रितसर प्लॅन