एमएस धोनी हे नाव माहित नसलेला कुणी चाहता क्वचितच सापडेल. क्रिकेटप्रेमी चाहत्यांच्या मनात धोनीने एक आगळे स्थान निर्माण केले आहे. आता धोनीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, तो जगातल्या बेस्ट फिनिशर्सपैकी का आहे. आयपीएलचा ‘एल क्लासिको’ गुरुवारी (दि. २१ एप्रिल) रात्री खेळला गेला. समोरा-समोर होते चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स. यादरम्यान मॅचमध्ये रोहितची पलटण पूर्णत: वरचढ होती. मात्र, अनेक चढ-उतारांनंतर सीएसकेला शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी १७ धावा पाहिजे होते. लक्ष्य अवघड नक्कीच होते. मात्र, एमएस धोनीच्या (MS Dhoni) डिक्शनरीमध्ये काहीच अशक्य नाही. मग काय, माहीने धुवांधार चौका मारत आपल्या टीमला तीन विकेटने शानदार विजय मिळवून दिला. शेवटच्या चेंडूंवर धोनीने १६ धावा केल्या. उथप्पानेही धोनीचे कौतुक केले.
या विजयाच्या पताका माइक्रो-ब्लॉगिंग मंच, कू ऍपवरही फडकावले जात आहेत. चाहते धोनीच्या या विजयाला देशाचा विजय मानत अतिशय खुश आहेत. यादरम्यान याच संघातील भारतीय क्रिकेटपटूने म्हणजेच रॉबिन उथप्पानेही (Robin Uthappa) आपल्या कू हॅंडलवरून खूपच रंजक पोस्ट केली आहे. या माध्यमातून उथप्पाने म्हटले आहे की, “माझ्यासाठी एकदम खास…२००व्या गोड विजयासोबत! सॉलिड सीएसके. धोनीच्या स्टाईलमध्ये हे संपवताना पाहताना कधीही थकू शकत नाही.”
उथप्पाची पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मुंबईला विजयासाठी १७ चेंडूंवर ४१ धावा वाचवायच्या होत्या. ‘मिस्टर फिनिशर’च्या नावाने प्रख्यात धोनीने पुन्हा एकदा या बिरुदाला जागत आपल्या संघाला या हंगामाचा दुसरा विजय मिळवून दिला. यासोबतच मुंबईला सलग सातवा पराभव पचवावा लागला. आयपीएलच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे, जेव्हा कुठल्या फ्रॅंचायझीला सतत सात मॅचेसमध्ये हार पत्करावी लागली.
चेन्नईकडून धोनीने १३ चेंडूंवर नाबाद २८ धावा काढल्या. अंबाती रायुडूने सर्वाधिक ३५ चेंडूंवर ४० धावा काढल्या. याशिवाय रॉबिन उथप्पाने २५ चेंडूंवर ३० धावांचे योगदान दिले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
याआधी मुंबईकडून तिलक वर्माने ४३ चेंडूंवर ५१ धावांचा नाबाद खेळ केला होता. याचबळावर मुंबई संघाने निर्धारित २० षटकांमध्ये ७ विकेट्सचे नुकसान सोसत १५५ धावा बनवल्या. मुंबईने २३ रन्सवरच ३ विकेट गमावले होते.
असे वाटत होते की, रोहित शर्माचा संघ १०० धावाही बनवू शकणार नाही, पण आधी सूर्यकुमार यादवने २१ चेंडूंवर ३१ धावांचे योगदान दिले. मग ऋतिक शोकीनने २५ चेंडूंवर २५ धावा काढल्या. शेवटी जयदेव उनाडकटनेही ९ चेंडूंवर नाबाद १९ धावा केल्या. यामुळे मुंबईचा संघ एक चांगला स्कोर बनवू शकला. पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित शर्मा आणि इशान किशन बाद झाले. युवा गोलंदाज मुकेश चौधरीने दोघांनाही बाद केले. यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये डेवाल्ड ब्रेविस हा धोनीकडून बाद झाला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रोहित-विराटची विकेट घेणारा कोण आहे मुकेश चौधरी? महाराष्ट्र संघासाठीही केलीय दमदार कामगिरी
मुंबई इंडियन्सच्या चुकांवर सचिनच्या शब्दांचे पांघरुण; म्हणतोय, ‘युवा संघ आहे, चुकांमधून…’