नुकतेच भारतीय संघाने टी२० मालिकेत न्यूझीलंडला जरी ३-० ने हरवलं असलं तरी काही खेळाडूंच्या प्रदर्शनावर आता प्रश्न उभे राहिले आहेत. टी-२० विश्वचषकातल्या पराभवानंतर भारताने न्यूझीलंडसमोर चांगले प्रदर्शन केले आहे. परंतु आपल्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जाणारा रिषभ पंत न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत फक्त ३३ धावा बनवू शकला आहे. त्यात तो २ वेळा नाबाद राहिला होता. यामुळे त्याच्या खेळावर प्रश्न उभे राहिले आहेत.
मात्र रॉबिन उथप्पाने पंतला पाठिंबा देताना म्हटले की, सलग क्रिकेट खेळणं आणि जैव सुरक्षित वातावरणात राहून कोणत्याही खेळाडूवर फरक पडू शकतो. पंतला आता आरामाची गरज आहे.
रॉबिन उथप्पा पंतला पाठिंबा देत म्हणाला की, “पंत गेल्या २ वर्षांपासून सतत भारतीय संघासोबत राहून प्रत्येक फॉरमॅटमध्ये खेळतोय. सोबतच सातत्याने जैव सुरक्षित वातावरणात राहूनही त्याच्या प्रदर्शनावर फरक पडत असावा. पंत उत्कृष्ट खेळाडू आहे. काही काळ त्याला आराम दिला की त्याला परत फॉर्ममध्ये यायची संधी नक्कीच मिळेल.”
उथप्पापूर्वी न्यूझीलंडचे माजी कर्णधार डॅनियल व्हेट्टोरीने पंतच्या प्रदर्शनावर म्हटले होते की, “त्याचे हे प्रदर्शन असेच चालू राहिले तर तो लवकरच संघाच्या बाहेर जाईल.”
पंतला न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. दोन संघांमधली पहिली कसोटी कानपुरमध्ये २५ नोव्हेंबरपासून सुरु होईल. त्यानंतर पंत दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पुनरागमन करू शकतो. पंतने टी-२० विश्वचषकात ३ डावांत ७८ धावा केल्या होत्या. त्याच्या एकूण टी२० कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास पंतने आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत ३५ डावांत ६२३ धावा केल्या आहेत, ज्याच्यात फक्त २ अर्धशतकं सामाविष्ट आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सने शेअर केला सचिन-जयसूर्या जोडीचा जुना फोटो, आकर्षक कॅप्शनसह वेधले सर्वांचेच लक्ष
ज्यूनियर हॉकी विश्वचषक: भारताची सलामी फ्रान्सविरूद्ध; पाहा संपूर्ण वेळापत्रक
धक्कादायक! गंभीरला इसिसकडून जीवे मारण्याची धमकी; दिल्ली पोलिसांनी वाढवली सुरक्षा