इंडियन प्रीमियर लीगच्या येत्या चौदाव्या हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे. नुकतीच बुधवारी (२० जानेवारी) आयपीएलच्या सर्व संघांनी कायम केलेल्या (रिटेन) आणि मुक्त केलेल्या (रिलीज) खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. रिटेन आणि रिलीजच्या या प्रक्रियेनंतर मिनी ऑक्शनपुर्वी संघांनी आपापसात खेळाडू ट्रेड करायला सुरुवात केली आहे. या यादीमध्ये एक ताजे नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे राजस्थान रॉयल्स संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रॉबिन उथप्पा याचे.
चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाने ३५ वर्षीय फलंदाज उथप्पा याला राजस्थानमधून ट्रेड करत आपल्या ताफ्यात सहभागी केले आहे. यानंतर क्रिकेट रसिकांनी सोशल मीडियावर त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
एका क्रिकेट रसिकाने, ‘सीएसकेत आल्यानंतर रॉबिन उथप्पाला अपेक्षेप्रमाणे पगार मिळेल’, अशी विनोदी प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी ‘केदार जाधव गेला आणि परत दुसरा जाधव आला’, अशी टीका उथप्पावर केली आहे.
#Robinuthappa will get pension as expected from @ChennaiIPL
— Sumukh Herlekar (@sumukh_herlekar) January 21, 2021
Kadar jadav was goes out of the team and another jadav joined @robbieuthappa#Uthappa. #Uthappatocsk pic.twitter.com/yNE7lGXI0V
— Aharan (@aharanmathi) January 21, 2021
https://twitter.com/memekatta/status/1352299954404954114?s=20
Hey @robin_rounder now Robin is officially part of CSK !!
We all know under what qualification category he was traded 😄
Expected Rahane as he is also 30+ but Uthappa age beats Rahane 🤟🏻
Signing( I mean Trade ) of the season Annai @deep_extracover ?! #Uthappa #CSK #IPL2021 https://t.co/tCjm2tXvtG
— Karthik Rao (@Cric_Karthikk) January 21, 2021
https://twitter.com/bhopesh18/status/1352291734420656129?s=20
@ChennaiIPL After knowing that Uthappa is 35+ 🚶♂#IPL2021 #CSK #uthappa https://t.co/Cfpf3x2J2w pic.twitter.com/575IU9kDQx
— Venky (@cant_be_matched) January 21, 2021
Before I started to type in here, twitter was asking "what's happening?"
Well.. exaaaaaaactly.. #WhistlePodu #IPL2021 #RobinUthappa
— RL (@vishal_tweep) January 21, 2021
Another Senior player for #CSK
last season #Dhoni mentioned most of #CSK players are very aged persons so its difficult for Run, fielding on field
Now i don't know why @ChennaiIPL pick #RobinUthappa ????? pic.twitter.com/GtTYLykpOK— @iamnandhustorms 💫 (@pratheshchaos23) January 21, 2021
https://twitter.com/illakiyakutty/status/1352422057175183366?s=20
Old patient Kedar jadav
New patient robin uthappa 😁👌 pic.twitter.com/Aub2rfb8q6— Rathujan ® (@rathu26) January 21, 2021
चेन्नईसोबत नवी सुरुवात करण्यास उत्सुक- उथप्पा
चेन्नई संघात सहभागी झाल्यासंदर्भात बोलताना उथप्पा म्हणाला की, “राजस्थान रॉयल्ससोबतचा माझा मागील आयपीएल हंगाम खूप चांगला राहिला. या संघासोबत घालवलेला वेळ माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला. आता यानंतर मी माझ्या क्रिकेट प्रवासाचा पुढील टप्पा चेन्नई सुपर किंग्ससोबत सुरू करणार आहे. यासाठी मी खूप उत्साहित आहे.”
राजस्थान रॉयल्सच्या अधिकाऱ्यांनी मानले आभार
उथप्पाला चेन्नईसोबत ट्रेड केल्यानंतर राजस्थान संघाचे अधिकारी लश मक्रम यांनी संघाच्या वतीने आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, “राजस्थान संघासाठी आपला अनमोल वेळ दिल्याबद्दल उथप्पा तुझे आभार. उथप्पाने मागील हंगामात गुवाहाटी आणि नागपुर येथे संघाच्या शिबिरावेळी महत्त्वपुर्ण योगदान दिले होते. याव्यतिरिक्त त्याने आपल्या भाषणाने सर्वांना प्रोत्साहित करण्याचे कामही केले होते.”
रॉबिन उथप्पाची आयपीएल कारकिर्द
अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज उथप्पा आजवर आयपीएलच्या पाच संघांसोबत खेळला आहे. यात मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पुणे वॉरियर्स इंडिया, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांचा समावेश आहे. आता एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई हा उथप्पाला आपल्या ताफ्यात सहभागी करणारा सहावा संघ ठरला आहे.
आयपीएल २०२०मध्ये राजस्थानचे प्रतिनिधित्त्व करताना उथप्पाला विशेष कामगिरी करता आली नव्हती. त्याने या पूर्ण हंगामात १२ सामने खेळत केवळ १९६ धावा केल्या होत्या. दरम्यान त्याला एकही अर्धशतक करता आले नव्हते. असे असले तरी, त्याची पूर्ण आयपीएल कारकिर्दीतील आकडेवारी प्रशंसनीय आहे. २००८ पासून उथप्पाने आयपीएलमध्ये एकूण १८९ सामने खेळले आहेत. दरम्यान २४ अर्धशतकांच्या मदतीने त्याने ४६०७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ८७ धावा या सर्वोच्च वैयक्तिक खेळीचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात अनुभवी शिलेदाराची भर, केल्यात ४०००हून अधिक धावा
क्रिकेटपटू नाही तर ‘या’ फुटबॉलपटूने RCB संघात निवड न झाल्याने ट्विटरवर व्यक्त केली नाराजी
ना ट्विट ना वक्तव्य, ‘त्या’ खास कामगिरीनंतर द्रविड-लक्ष्मण यांचा विहारीला थेट ‘पर्सनल मॅसेज’