भारतीय कुस्तीपटू महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी जंतर-मंतरवर गेल्या महिन्याभरापासून आंदोलन छेडलं होतं. या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने कुस्तीगीरांनी न्याय हक्कांसाठी त्यांचा मोर्चा नव्या संसद भवनाकडे वळवल्याचे आपण पाहिले. रविवारी (दि. 28 मे) नव्या संसद भवनाचं उद्घाटन पार पडले. असे असताना कुस्तीगीरांनी महिला ‘महापंचायत’साठी नवीन भवनाकडे जाण्याचा प्रयत्न केला, पंरतू त्यांचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. नव्या संसद भवनाच्या दिशेने जाणाऱ्या काही कुस्तीगीरांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. यानंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या.
सुवर्णपदक मिळवणाऱ्या खेळाडूंची न पाहावणारी दृश्य आली समोर
यावेळी कुस्तीगीरांनी महिला महापंचायतसाठी नवीन संसद भवनाडे निश्चय घेतला होता. मात्र, आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी फरफटत नेल्याचे चित्र समोर आले. हे दृश्य पाहून भारताचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याने कुस्तीपटूंबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
उथप्पाचे ट्वीट व्हायरल
घडलेल्या प्रकाराबाबत ट्वीट करत उथप्पाने (Former Indian player Robin Uthappa) लिहिले की, “आपल्या कुस्तीपटूंबाबत जे होत आहे, ते पाहून अतंत्य दु:ख होत आहे. हे प्रकरण मिटवण्यासाठी शांतीपूर्ण मार्ग निघेल याची मला खात्री वाटते.” त्याने पुढे लिहिले की, “मी प्रार्थना करतो की, कुणालाही यातून दुखापत होऊ नये आणि हे प्रकरण लवकरात लवकर मिटावे.”
महिनाभरापासून सुरू होते आंदोलन
गेल्या महिनाभरापासून जंतर-मंतर (Jantarmantar) येथे भारतीय कुस्तीपटू महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग (Wrestlers Federation of India President Brijbhushan Singh) यांच्याविरोधात कुस्तीगीरांचे आंदोलन सुरू होते. त्यांच्यावर अनेक कुस्तीपटूंनी लैंगिक अत्या’चाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना बळजबरीने हटवण्यात आले. साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंज पुनिया यांच्यासह अनेक कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, त्यांना पुन्हा सोडण्यात आले.
अनिल कुंबळेनेही केले दुःख व्यक्त
यापूर्वी भारताचा माजी खेळाडू अनिल कुंबळे (Anil Kumble) यानेही कुस्तीपटूंबद्दल (Wrestlers) दु:ख व्यक्त केले होते. कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीबाबत कुंबळेने ट्वीट केले होते की, “28 मे रोजी आपल्या कुस्तीपटूंसोबत जे गैरवर्तन झाले, ते बघून मी निराश झालो आहे. योग्य संभाषणातून कोणतीही गोष्ट सोडवली जाऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर तोडगा निघेल अशी आशा आहे.”
आता कुस्तीपटूंच्या मागण्या मान्य होतात की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (robin uthappas big statement on the issue of wrestlers of jantar mantar)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
काय कॅच आहे! पठ्ठ्याने चित्त्याची चपळाई दाखवत एका हाताने पकडला अफलातून झेल, सतत पाहिला जातोय
IPL फायनलमधील धोनीचा ‘हा’ भावूक करणारा व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील, जोरदार होतोय व्हायरल