भारतीय क्रिकेटमधून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या अध्यक्षपदाशी संबंधित आहे. बीसीसीआयला नवीन अध्यक्ष मिळाले आहेत. माजी क्रिकेटपटू आणि विश्वचषक विजेते रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे. ते बीसीसीआयचे 36 वे अध्यक्ष ठरले आहेत.
मंगळवारी (18 ऑक्टोबर) मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या एजीएममध्ये रॉजर बिन्नी (Roger Binny) यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याची जागा बिन्नी यांनी घेतली आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरणारे 67 वर्षीय बिन्नी हे एकमेव उमेदवार होते. त्याचबरोबर बीसीसीआयला प्रथमच विश्वविजेता क्रिकेटपटू पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून मिळाला आहे.
कोण आहेत रॉजर बिन्नी?
भारताचा मध्यमगती वेगवान गोलंदाज बिन्नी 1983च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य राहिले आहेत. या स्पर्धेत त्यांनी 8 सामन्यांत 18 विकेट्स गेतल्या होत्या. त्यामुळे ते त्या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज ठरले होते. ते आक्रमक फलंदाजही राहिले आहेत. त्यांनी सलामीला आणि मधल्या फळीतदेखील फलंदाजी केली आहे. तसेच त्यांनी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचेही काम पाहिले आहे. ते भारताच्या निवडसमितीचेही सदस्य राहिले आहेत.
विशेष म्हणजे ते भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणारे पहिले एंग्लो इंडियन होते. त्यांनी पाकिस्तानकडून 1979मध्ये पदार्पण केले होते. ते भालाफेकपटूही राहिले आहे. त्यांनी राष्ट्रीय विक्रमही केला होता.
बिन्नी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द-
27 कसोटी सामन्यांमध्ये 47 विकेट्स घेतल्या असून 830 धावा केल्या आहेत. 72 वनडे सामन्यांमध्ये 77 विकेट्स घेत 629 धावा केल्या आहेत.
गांगुली यांना आयपीएल अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली होती पण त्याने ती नम्रपणे नाकारली. त्याच संस्थेचे प्रमुख झाल्यानंतर बीसीसीआयच्या उपसमितीचे प्रमुख बनणे तो स्वीकारू शकत नाही, असा त्यांचा तर्क होता. त्यांनी या पदावर कायम राहण्यास रूची दर्शवली होती, ” असे बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले.
गांगुली यांनी 2019मध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपद स्विकारले होते. त्यांचा बीसीसीआयचा तीन वर्षाचा कार्यकाळ संपला आहे. तसेच त्यांनी आयपीएलचे अध्यक्षपद नाकारल्याने क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे धाकटे भाऊ अरुण सिंह धुमाळ हे या पदावर नियुक्त केले गेले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकाच्या ‘या’ विक्रमावर विराट, रोहितची नजर! जयवर्धनेची 8 वर्षांची बादशाहत उध्वस्त करण्याची संधी
पहिला आणि एकमेव; रोहित वा विराट नव्हे तर ‘या’ एकट्या भारतीय धुरंधराने टी२० विश्वचषकात ठोकलंय शतक