टेनिस विश्वातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने गुरुवारी (15 सप्टेंबर) व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. पुढील आठवड्यात होणाऱ्या लेवर कपनंतर आपण कोणतेही ग्रँडस्लॅम अथवा एटीपी स्पर्धा खेळणार नसल्याचे त्याने जाहीर केले. सोशल मीडियावर पत्र शेअर करत त्याने ही घोषणा केली. तो टेनिसमधील महान खेळाडू असून मालमत्तेच्या बाबतीतही तो तितकाच पुढे आहे. फेडरर सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत येतो.
टेनिसमध्ये सेरेना विल्यम्स पाठोपाठ रॉजर फेडरर (Roger Federer) यानेही आपला खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या 24 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक स्पर्धा आणि ग्रँड स्लॅम्स जिंकले. याचबरोबर त्याला मानधनही मिळाले असून त्याची आकडेवारी पाहता तुम्हाला धक्काच बसेल. एका रिपोर्टनुसार सप्टेंबर 2022पर्यंत त्याची एकूण नेटवर्थ 550 मिलियन डॉलर (4400 कोटी रूपये) एवढी आहे.
फेडररची निव्वळ संपत्ती 550 मिलियन डॉलर एवढी आहे असे म्हटले जाते की, कारकिर्दीनंतर त्याने जवळपास 1 बिलियन डॉलर एंडोर्समेंट आणि टेनिस खेळून 115 मिलियन डॉलरपेक्षा अधिक कमावले आहे. ही मिळकत प्रामुख्याने टेनिसमध्ये मिळालेले मानधन आणि ब्रँड्सच्या जाहिराती यांमधून आलेली आहे.
फेडररची गणना जगातील श्रीमंत खेळाडूंमध्ये केली जाते. एका मीडियाच्या रिपोर्टनुसार, 4 सप्टेंबर 2022 पर्यंत या टेनिस स्टारची नेटवर्थ 550 मिलियन डॉलर होती. त्याच्या कमाईबाबत पाहिले तर तो टेनिसबरोबर अनेक प्रसिद्ध ब्रँड्स चा ब्रँड एंबसेडर आहे. यातील मोठे नाव रोलेक्स. फेडररने 2006मध्ये रोलेक्सचा ब्रँड एंबसेडर झाला. त्याच्या या कमाईची तुलना भारताचा फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्याशी केली तर ती तिप्पट पटीने अधिक आहे.
फोर्ब्सच्या (Forbes) रिपोर्टनुसार, फेडररने रोलेक्ससोबत 2006मध्ये 10 वर्षासाठी करार केला होता. हा करार 15 मिलियन डॉलर एवढा होता. यामुळे त्याने प्रत्येक वर्षी 1.5 मिलियन डॉलर रोलेक्स ब्रँडमधूननच कमावले आहे. 2016मध्ये त्याचा करार संपला तर पुन्हा एकदा त्या कंपनीने प्रत्येक वर्षासाठी 8 मिलियन डॉलरचा नवा करार केला.
टेनिसमध्ये कमावले 129 मिलियन डॉलरपेक्षा अधिक
विविध टेनिस स्पर्धांमध्ये खेळताना फेडररला 129 मिलियन डॉलरपेक्षा अधिक मानधन मिळाले आहे. कमाईच्या बाबतीत, त्याची कारकीर्द 2007 मध्ये शिखरावर पोहोचली जेव्हा त्याने 10.1 दशलक्ष डॉलरची कमाई केली. त्याने रोलेक्ससोबतच नाही तर अनेक मोठ्या ब्रँड्ससोबत करार केला. त्याने क्रेडीट सुइस, मर्सिडीज, युनीक्लो असा कंपन्यांसोबत करार केला. तसेच राफेल नदाल (131 मिलियन डॉलर) आणि नोवाक जोकोविच (159 मिलियन डॉलर) यांनी टेनिसमधून सर्वाधिक कमाई केली आहे.
वर्षानुवर्षे जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकांवर राहिलेल्या फेडररने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ६ ऑस्ट्रेलियन ओपन, ८ विम्बल्डन, ५ यूएस ओपन आणि १ फ्रेंच ओपन या ग्रँडस्लॅम स्पर्धांचे विजेतेपद पटकावले आहे.
फेडररच्या गाड्यांचे कलेक्शन
फेडरर हा गाड्यांचा चाहता आणि मर्सिडीज बेंझचा ब्रँड एंबसेडर आहे. यामुळे त्याच्याकडे मर्सिडीज एएमजी जीटी एस, मर्सिडीज जीएलई जी663 कूप, मर्सिडीज एसएल एएमजी, मर्सिडीज एसएल एएमजी रोडस्टर आणि मर्सिडीज सीएलएस 450 या बरोबरच मर्सिडीजच्या अनेक क्लासिक गाड्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! मुंबई इंडियन्सला मिळाले नवे प्रशिक्षक, जयवर्धनेंच्या जागी ‘या’ दिग्गजाची वर्णी
भारताची ऐतिहासिक विजयाची संधी हुकली, इंग्लंडने निर्णायक टी20 जिंकत मालिकाही केली नावावर
न्यूझीलंड क्रिकेटमध्ये भूकंप, टी20 विश्वचषकापूर्वी धाकड अष्टपैलूने नाकारला केंद्रीय करार