लंडन | महान टेनिसपटू राॅजर फेडरर आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. विशेष म्हणजे तो कसोटी क्रमवारीत फलंदाजीत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.
त्याचे झाले असे की काल सामन्यापुर्वी सराव करताना फेडररने एक शाॅट हा फाॅरवर्ड डिफेंसप्रमाणे मारला. याचा खास विडिओ विंबल्डनने ट्विटरवर शेअर केला. शिवाय यात आयसीसीलाही टॅग केले आणि विचारले की राॅजरची रॅंकिंग काय?
Ratings for @rogerfederer's forward defence, @ICC?#Wimbledon pic.twitter.com/VVAt2wHPa4
— Wimbledon (@Wimbledon) July 9, 2018
यावर आयसीसीनेही गमतीशिर ट्विट केले. त्यात एक स्क्रीनशाॅट आयसीसीने शेअर केला. ज्यात फेडरर कसोटी क्रमवारीत अव्वल असल्याचे दिसत आहे. तसेच ही यादी जूलै महिन्यात अपडेट केली असल्याचेही दिसतं आहे.
*sigh* ok… 👇 pic.twitter.com/KXnhaznxL8
— ICC (@ICC) July 9, 2018
When greatness recognises greatness 👌 pic.twitter.com/UB2hJli5gw
— ICC (@ICC) July 9, 2018
तसेच पुन्हा एक खास ट्विट करत जेव्हा दिग्गज एकमेकांना ओळखतात असाही ट्विट केला आहे.
राॅजर फेडरर उपांत्यपुर्व फेरीत दाखल-
काल फेडररने अॅड्रियन मुनरियोवर विजय मिळवत विंबल्डनची उपांत्यपुर्व फेरी गाठली. तो सलग ३२ सेट या स्पर्धेत जिंकला आहे. तर त्याची ही १५ वी उपांत्यपुर्व फेरी आहे. त्याने ६-०, ७-५, ६-४ असा काल अॅड्रियन मुनरियोचा पराभव केला.
महत्वाच्या बातम्या-
-नदालचा हा फोटो का होतोय एवढा व्हायरल, काय आहे कारण?
-फिफा विश्वचषकातील आज होणाऱ्या फ्रान्स विरूद्ध बेल्जियम सामन्याबद्दल सर्वकाही