महान टेनिसपटू रॉजर फेडरर यावर्षी विंम्बलडनमध्ये UNIQLO चे प्रायोजकत्व असलेली जर्सी घालुन उतरला होता. मात्र फेडररची खास ओळख असलेला त्याचा ‘RF’ लोगो कोठेही दिसत नसल्याने सर्वांना आश्चर्य वाटले.
यामागचे कारण असे की जियाबाटिस्ट बोडोनी यांनी डिजाईन केलेल्या ‘RF’ लोगोचे हक्क नाईके कंपनीकडे आहेत. त्यामुळे सध्या फेडररला तो लोगो वापरता येणार नाही. पण लवकरच हा लोगो पुन्हा माझ्याकडे येईल असे फेडररने सांगितले आहे.
फेडररला यावर्षी विंम्बलडन स्पर्धेपासुन UNIQLO या जपानच्या कंपनीने प्रायोजकत्व द्यायला सुरुवात केली आहे. याआधी नाईके या कंपनीचे फेडररला प्रायोजकत्व होते.
नाईके फेडररला दरवर्षी 7.5 मिलियन युरो देत होते, पण UNIQLOने फेडररला दरवर्षी 22.5 मिलियन युरो देण्याचा करार केला.
त्यामुळे नाईकेचा आणि फेडररचा करार यावर्षी संपुष्टात आला आहे. पण मात्र ‘RF’ असा फेडररचा लोगो नाईके या कंपनीकडेच राहिला आहे. त्यामुळे हा लोगो परत मिळवण्यासाठी फेडरर प्रयत्न करणार आहे.
असे असले तरी अजुनही फेडरर आणि नाईकेचा करार पुर्णपणे संपलेला नाही. फेडरर अजुनही नाईकेचेच शुज वापरत आहे. कारण UNIQLO ही कंपनी टेनिस फुटवेअर बनवत नाही.
फेडररने विंम्बलडन 2018 स्पर्धेत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
-वादग्रस्त निक किर्गिओसने मारलेला ताशी २१७ कि.मी वेगाच्या चेंडूने बॉल गर्ल जखमी
–विंबल्डनचे चाहते आहात? मग या १० गोष्टी माहित असायलाच हव्यात..
–विंबल्डनमध्ये एकेरीत खेळणाऱ्या भारतीय खेळाडूला पराभूत होऊनही मिळाले ३५ लाख रुपये