fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

विंबल्डनचे चाहते आहात? मग या १० गोष्टी माहित असायलाच हव्यात..  

-आदित्य गुंड

विंबल्डन म्हणजे टेनिस चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. वर्षभरात होणाऱ्या चार ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये विंबल्डन ही सगळ्यात जुनी ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे. इतर ग्रँडस्लॅम स्पर्धांपेक्षा या स्पर्धेचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. बदलत्या काळानुसार इतर स्पर्धा आपले रूप बदलत असताना विंबल्डन मात्र आपली एक परंपरा बाळगून आहे. या स्पर्धेच्या अशाच काही अनोख्या परंपरांविषयी माहिती देण्याचा हा प्रयत्न..

स्पर्धांची नावे – 
इतर स्पर्धांमध्ये पुरुष आणि स्त्रियांच्या स्पर्धांना अनुक्रमे ‘मेन्स सिंगल्स/डबल्स’ आणि ‘वूमेन्स सिंगल्स/डबल्स’ असे पुकारले जाते. विंबल्डनमध्ये मात्र असे न करता या स्पर्धांना ‘जंटलमेन्स सिंगल्स/डबल्स’ आणि ‘लेडीज सिंगल्स/डबल्स’ असे म्हटले जाते.
बॉल बॉईज आणि बॉल गर्ल्स –
कुठल्याही टेनिस स्पर्धेमध्ये बॉल बॉईज आणि बॉल गर्ल्स यांचे सहकार्य मोलाचे असते. विंबल्डनसाठी साधारण १५ वर्षे वयोगटातील २५० मुलामुलींचा समावेश असतो. त्यांचे प्रशिक्षण फेब्रुवारी महिन्यापासूनच सुरु होते. विंबल्डनमध्ये बॉल बॉय अथवा गर्ल म्हणून पात्र होण्यासाठी त्यांना शारीरिक आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते. प्रत्येक कोर्टवर सहा जण अशी त्यांची विभागणी केली जाते. विंबल्डनच्या १३ दिवसांच्या कालावधीमध्ये या मुलामुलींना साधारण १२० ते १५० पौंड एवढी कमाई होते. या मुलामुलींना ‘BBG’ असे टोपणनावही आहे.
तिकिटे –
विंबल्डनची तिकिटे मिळवणे हे एक अतिशय अवघड काम आहे. तिकिटे मिळवण्यासाठी चार पाच पर्याय असतात. लोक अगदी आदल्या दिवशी तंबू टाकून तिकीटखरेदीसाठीच्या रांगेत नंबर लावतात. ही तिकिटे कशी मिळवावीत हे जाणून घेण्यासाठी महास्पोर्ट्सचा हा लेख वाचा.
स्ट्रॉबेरीज आणि क्रीम –
विंबल्डन, स्ट्रॉबेरीज आणि क्रीमचे एक अनोखे नाते आहे. स्पर्धेदरम्यान कोर्टवर स्ट्रॉबेरीज आणि क्रीम तुम्हाला विकत घेता येते. खेळाडूंच्या ब्रेकफास्टमध्येही स्ट्रॉबेरीज आणि क्रीम उपलब्ध असते. दर वर्षी विंबल्डनमध्ये अंदाजे २३ टन स्ट्रॉबेरीज आणि ७००० लिटर क्रीम फस्त केले जाते. गेल्या वर्षी म्हणजे २०१७ मध्ये ३४ टन स्ट्रॉबेरीज आणि १०००० लिटर क्रीमवर ताव मारला.
प्रायोजकांच्या जाहिरातीला ‘नो एंट्री’ –
अनेक स्पर्धांमध्ये कोर्टवर बेसलाईनच्या मागे असलेल्या जागेवर किंवा नेटवरदेखील स्पर्धेच्या प्रायोजकांच्या जाहिराती असतात. विंबल्डन मात्र याला अपवाद आहे. विंबल्डनच्या कोर्टवर कुठेही प्रायोजकांच्या जाहिराती अथवा त्यांच्या कंपनीचे लोगो दिसून येत नाहीत.
विंबल्डनचे टॉवेल – 
विंबल्डन स्पर्धेचे टॉवेल २०१० पासून भारतात बनवले जातात. त्याअगोदर हे काम ख्रिस्ती नावाच्या एका ब्रिटिश कंपनीकडे होते. भारतीय कंपनी वेलस्पन इंडिया लिमिटेडने २००६ मध्ये ख्रिस्ती कंपनीवर ताबा मिळवला आणि टॉवेल बनवण्याचे काम आपल्या गुजरात येथील प्रकल्पामध्ये हलवले.
विंबल्डनमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी हे टॉवेल परत करणे अपेक्षित असते. मात्र पुन्हा कधी आयुष्यात आपण विंबल्डन खेळू अथवा नाही याची खात्री नसते म्हणून किंवा या स्पर्धेची आठवण म्हणून अनेक खेळाडू हे टॉवेल स्वतःबरोबर घेऊन जाणे पसंत करतात. याला अगदी दिग्गज खेळाडूही अपवाद नसतात. दरवर्षी खेळाडूंना दिलेल्या टॉवेलपैकी केवळ २० ते २५ टक्के टॉवेल आयोजकांकडे परत जमा होतात.
गेल्या वर्षी मुंबईत जोरदार पाऊस झाला. त्यावेळी घरात पाणी येऊ नये म्हणून महेश भूपतीची पत्नी अभिनेत्री लारा दत्ता हिने आपल्या नवऱ्याने विविध स्पर्धांची आठवण म्हणून आणलेले टॉवेल वापरले. एवढ्यावरच न थांबता तिने त्याचा फोटो काढून ट्विटरवर अपलोड केला. त्यामुळे अर्थातच महेशचा संताप अनावर झाला आणि त्याने ते ट्विटरवर तो व्यक्तही केला.

पंचांची खुर्ची – 
वर्षभरात होणाऱ्या चार ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी केवळ विंबल्डनमध्ये पंचांची खुर्ची लाकडाची असते. वेगवेगळ्या कोर्टवर एकाचवेळी चालणाऱ्या सामन्यांसाठी एकूण २१ खुर्च्या असतात. यातल्या २ खुर्च्या राखीव म्हणून वापरल्या जातात. ह्या खुर्च्या साध्यासुध्या नसून त्यात खेळाडूंसाठी शीतपेये ठेवण्याकरता शीतकपाट, पंचांना पंच कक्षाबरोबर त्वरित संपर्क साधता येण्याकरता एक फोन आणि आयबीएम कंपनीचे एक टॅबलेट अशा सुविधा पुरविलेल्या असतात. खेळाडूंनी सामना सुरु असताना नवीन टॉवेलची मागणी केल्यास याच फोनचा वापर करून पंच नवा टॉवेल मागवतात.
खुर्चीच्या एका बाजूला एक छोटी पेटी असते. या पेटीमध्ये लाकडाचा भुस्सा असतो. खेळताना तळव्याला घाम आल्यास खेळाडू पंचांकडे त्याची मागणी करू शकतात.
यावर्षीच्या विंबल्डनमध्ये या गोष्टींकडे लक्ष देण्यास विसरू नका.

क्रिकेटवरील “भारतीय क्रिकेटचे शापीत शिलेदार” लेखमालिकेतील काही खास लेख-

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १० – विस्मृतीत गेलेला अजय रात्रा

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ९ – तिसरा गोलंदाज

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ८ – आठवावा लागणारा निखिल चोप्रा

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले!

-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते!!

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर 

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर

 

You might also like