---Advertisement---

विंबल्डन २०१८- आठ वेळचा विजेता राॅजर फेडरर दुसऱ्या फेरीत

On: सोमवार, जुलै 2, 2018 8:13 PM
---Advertisement---

लंडन | स्वित्झर्लंडचा राॅजर फेडरर विंबल्डन २०१८च्या दुसऱ्या फेरीत पोहचला आहे. त्याने दुसान लाजोविकला ६-१, ६-३, ६-४ असे पराभूत केले.

हा त्याचा या स्पर्धेतील गेल्या २० वर्षातील १०३वा सामना होता.

सलग २०व्या विंबल्डन स्पर्धेत खेळत असलेल्या फेडररने जागतिक क्रमावारित ५७व्या स्थानी असलेल्या लाजोविकला केवळ ७९ मिनीटांत पराभूत केले.

या स्पर्धेत विजेतेपदाचा सर्वात प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या फेडररने यावर्षी क्ले कोर्टचा संपुर्ण हंगाम कोर्टपासून दुर रहाणे पसंत केले. त्यानंतर त्याची ही तिसरी मोठी स्पर्धा आहे.

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या फेडररला या स्पर्धेत अव्वल मानांकन देण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

क्रिकेटर विनोद कांबळी आणि पत्नीच्या विरोधात एफआयआर दाखल

क्रिकेटला मिळाला पहिला १०० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणार खेळाडू

आप की अदालत फेम रजत शर्मांची क्रिकेटमध्ये नविन इनिंग सुरु

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment